निवडणूका येऊ द्या तरी, आम्ही पण निवडणूकीला तयार आहोत; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

By मुरलीधर भवार | Published: February 13, 2023 05:56 PM2023-02-13T17:56:22+5:302023-02-13T17:56:41+5:30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर कोणत्याही निवडणूका लावून दाखवा असे आवाहन विद्यमान सरकारला केले आहे.

Let the elections come, we are also ready for elections; | निवडणूका येऊ द्या तरी, आम्ही पण निवडणूकीला तयार आहोत; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

निवडणूका येऊ द्या तरी, आम्ही पण निवडणूकीला तयार आहोत; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Next

डोंबिवली-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर कोणत्याही निवडणूका लावून दाखवा असे आवाहन विद्यमान सरकारला केले आहे. त्याला प्रतिउत्तर देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडणूका लावून दाखावा म्हणजे काय असा सवाल उपस्थित करीत महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे. निवडणूका लागतील तेव्हा आम्ही पण निवडणूकाला तयार आहोत असा टोला लगावला आहे. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आदी विषय न्यायप्रविष्ट असताना निवडणूका घ्या असा असे बोलणो कितपत योग्य आहे याकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेची माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे आणि खासदार शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट आणि डोंबिवली पश्चिमेतील डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाची अद्यावत वातानुकूलीत अभ्यासिका साकारण्यात आली आहे. या दोन्ही विकास कामाचे लोकार्पण खासदार शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आले. यावेळी खासदार शिंदे यांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पांतील घरांची चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दिल्या जाणार आहेत . महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पात बाधितांना या प्रकल्पातील घरे दिली जाणार आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे १४ तारखेला कल्याण लोकसभेच्या दौ:यावर आहेत. भाजपकडून कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा सांगितला जात असल्याविषयी खासदार शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री ठाकूर याआधीही कल्याणमध्ये आले होते. तेव्हा मी स्वागत केले होते. आत्ताही त्यांचे स्वागतच करणार आहे. प्रत्येक पक्ष आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात मिडियाने दुस:या कोणत्या गोष्टी करु नयेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात चांगले अंडरस्टॅण्डींग आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चांगले काम करीत आहेत.

Web Title: Let the elections come, we are also ready for elections;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण