पी1 अन् पी 2 नियमांना व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध; नियम बदलण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 03:46 PM2021-03-14T15:46:50+5:302021-03-14T15:52:28+5:30

केडीएमसी आयुक्त  डॉ विजय सूर्यवंशी हे यावर काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.

Letter from traders in Dombivali to KDMC Commissioner to change the rules | पी1 अन् पी 2 नियमांना व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध; नियम बदलण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना पत्र

पी1 अन् पी 2 नियमांना व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध; नियम बदलण्यासाठी केडीएमसी आयुक्तांना पत्र

googlenewsNext

कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने  दुकानदारांना वेळेचे निर्बंध घालून दिले आहेत. यामध्ये  शनिवारी व रविवारी पी१ व पी२ अश्या पध्दतीने दुकाने सुरू ठेवावी असा  देखील नियम आहे.  या निर्णयाला कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतील व्यापा-यांनी सुद्धा विरोध दर्शविला असून यांबाबत केडीएमसी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांना पत्राद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. यामध्ये दुकानांची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 करावी असे देखील नमूद करण्यात आले आहे. 

केडीएमसीने दुकानांबाबत  घेतलेल्या निर्णयावर   कल्याण डोंबिवलीतील व्यापा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रामुख्याने शनिवारी आणि रविवारी हे दोन दिवस  व व्यवसायाच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्त्वाचे आहे असे व्यापारी सांगतात. त्यामुळे केडीएमसी आयुक्त  डॉ विजय सूर्यवंशी हे यावर काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.

Web Title: Letter from traders in Dombivali to KDMC Commissioner to change the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.