बॅरिकेड्स सरकवून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:13 AM2021-01-06T00:13:15+5:302021-01-06T00:13:20+5:30

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक ठाकुर्ली पुलावरून सुरू आहे. कल्याण रोडवरील मंजुनाथ शाळा, व्ही.पी. रोडवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत.

The life-threatening journey of two-wheelers by sliding barricades | बॅरिकेड्स सरकवून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

बॅरिकेड्स सरकवून दुचाकीस्वारांचा जीवघेणा प्रवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
डाेंबिवली : अनलॉकमध्ये आता सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने शहरात पुन्हा वाहतूककोंडी होऊ लागली आहे. मात्र, कल्याण रोडवर पारसमणी चौक ते मंजुनाथ शाळेदरम्यान ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लावलेले प्लास्टिकचे दुभाजक आणि बॅरिकेड्स बाजूला सरकवून दुचाकीस्वार बिनधास्त ये-जा करत आहेत. त्यामुळे हा शॉर्टकट अपघाताला निमंत्रण देणाराच ठरत आहे. या प्रकारामुळे वाहतूककोंडीत भरच पडत असल्याने नियमबाह्य क्रॉसिंग तातडीने थांबवावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.


डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक ठाकुर्ली पुलावरून सुरू आहे. कल्याण रोडवरील मंजुनाथ शाळा, व्ही.पी. रोडवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत.
मंजुनाथ शाळेच्या चौकात तसेच जुन्या रामचंद्र टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुभाजक, बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे एमआयडीसीकडून आलेली वाहने मंजुनाथ शाळेच्या चौकात उजवीकडे वळून व्ही.पी. रोडने पश्चिमेस जाऊ शकत नाहीत. व्ही.पी. रोडने व जुन्या रामचंद्र टॉकीजवरून आलेल्या वाहनांना उजवीकडे वळून पारसमणी चौकाकडे थेट जाता येत नाही. तसेच रामचंद्र टॉकीजवरून आलेल्या वाहनांना सरळ गोपाळनगर गल्ली क्रमांक १ मध्ये ये-जा करता येत नाही. मात्र, दुचाकीस्वार हे बॅरिकेड्स, दुभाजक सरकवून ये-जा करत आहेत. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या तसेच तेथून पारसमणी चौकाकडे येणाऱ्या दोन्ही लेनमध्ये वाहतूककोंडी होत आहे.


दुचाकीस्वार ट्रिपल सीट घेऊन वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. अशा पद्धतीने दुचाकीने नेताना एखाद्याचा तोल गेल्यास अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The life-threatening journey of two-wheelers by sliding barricades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.