केडीएमसी हद्दीतील बेकायदा शाळांची यादी जाहीर; टिटवाळ्यातील ३ इंग्रजी शाळांचा समावेश
By प्रशांत माने | Published: May 30, 2024 06:38 PM2024-05-30T18:38:24+5:302024-05-30T18:38:32+5:30
संबंधित शाळांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच त्या शाळांमधील विदयार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल असेही जाधव यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.
कल्याण: केडीएमसी दरवर्षी हद्दीतील बेकायदा शाळांची यादी जारी करते. तीन बेकायदा शाळांची यादी गुरूवारी जारी झाली. सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून त्या टिटवाळा शहरातील आहेत.
मांडा टिटवाळा येथील सांगोडा स्मशानभूमीजवळील एस.जी.टी एलिमेंटरी स्कूल, टिटवाळा बल्याणी येथील संकल्प इंग्रजी स्कूल तसेच टिटवाळा पुर्वेतील बल्याणी टेकडी, डोंगरवाली माता मंदिर नजीकची ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल या तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असल्याने या बेकायदेशीरपणे चालू असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आहे. संबंधित शाळांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच त्या शाळांमधील विदयार्थ्यांना अन्य शाळांमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल असेही जाधव यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे.