कालीदास दिनानिमित्त कल्याणमध्ये साहित्यिक मेळावा संपन्न
By अनिकेत घमंडी | Published: July 2, 2024 10:46 AM2024-07-02T10:46:14+5:302024-07-02T10:46:35+5:30
देशमुख यांनी मंगळवारी माध्यमांना माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: अखिल भारतीय साहित्य परिषद कल्याण शाखेच्या वतीने साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने बदल रहा परिवेश या डॉ. रामचंद्र साहू यांच्या गीत संग्रहाचे लोकार्पण लखनौचे साहित्यिक हरिमोहन अवस्थी, अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत कार्याध्यक्ष कवी प्रवीण देशमुख, शहर अध्यक्ष डॉ. शामसुंदर पाण्डेय आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याबद्दल देशमुख यांनी मंगळवारी माध्यमांना माहिती दिली, ते म्हणाले।की, अवस्थी यांनी काही मुक्तक सादर केले, देशमुख यांनी मेघदूतातील दोन श्लोकांवर भाष्य केले. पश्चिमेकडील आग्रा रस्त्यावर असलेल्या नमस्कार मंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मंत्री संजय द्विवेदी, मदनकुमार उपाध्याय, डॉ. रामचंद्रजी साहु, सुशीलकुमार पाण्डेय, स्वानंद क्षीरसागर, मंगला कांगणे, सुमित्रा गुप्ता, मा. रूपेश पाटील, अन्नपूर्णा गुप्ता, डॉ. दुर्गेश कुमार दुबे, सत्यभामासिंग, सुमिता भोसले या साहित्यिकांनी महाकवी कालिदासांवर व त्यांच्या साहित्यातील सौंदर्यावर भाष्य, काहींनी काव्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर भारती यांनी केले. अध्यक्ष डॉ. शामसुंदर पाण्डेय यांनी कल्याण शाखेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची ओळख सभेला करून दिली.