Central Railway Update: मध्य रेल्वे विस्कळीत; कसारा-उंबरमाळी दरम्यान ट्रॅकखाली खड्डा पडला
By अनिकेत घमंडी | Published: March 9, 2023 08:07 AM2023-03-09T08:07:00+5:302023-03-09T08:10:41+5:30
वंदे भारत पुढे काढण्यासाठी गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस खर्डी मध्ये थांबवून ठेवण्यात आली आहे.
डोंबिवली: कसारा-उंबरमाळी दरम्यान तांत्रिक बिघाडामूळे अप दिशेची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत ठप्प. त्या मार्गावर ट्रॅकमध्ये खड्डा पडल्याने वाहतूक खोळंबली असल्याचे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी सांगितले.
मध्य रेल्वे विस्कळीत #CentralRailway#Railay#LocalNews#Local#Mumbaihttps://t.co/JkFetXvxHCpic.twitter.com/RMPFZoZIJy
— Lokmat (@lokmat) March 9, 2023
वंदे भारत पुढे काढण्यासाठी गोरखपूर सुपरफास्ट एक्सप्रेस खर्डी मध्ये थांबवून ठेवण्यात आली आहे. एक लोकल वेगमर्यादा ठेवून घटनास्थळावरून पुढे नेण्यात आली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.