शहरांतर्गत बस सेवा चालविली नाही तर केडीएमटीला टाळे ठोकू; शिवसेना ठाकरे गटाचा केडीएमटीला इशारा
By मुरलीधर भवार | Published: October 31, 2023 02:59 PM2023-10-31T14:59:45+5:302023-10-31T15:01:03+5:30
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम आहे. मात्र उपक्रमातील बसेस पनवेल, नवी मुंबई आणि भिवंडी मार्गावर चालविल्या जातात. या बसेसचा शहरातील नागरीकांना उपयोग होणार नसल्यास केडीएमटी कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज देण्यात आला आहे. ठाकरे गटाने आज केडीएमटी कार्यालयावर धडक दिली.
ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांच्यासह शहर प्रमुख सचिन बासरे, पदाधिकारी रविंद्र कपोते, विजया पोटे, अरविंद पोटे, विजय काटकर, हर्षवर्धन पालांडे, दत्तात्रय खंंडागळे आदी उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांची भेट घेतली. जिल्हाप्रमुख साळवी यांनी सांगितले की, नुकतेच गणपती, नवरात्र सण झाले. लोकांचे हाल होते. रिक्षा वारेमाप भाडे आकारतात. परिवहन समिती ज्या साठी स्थापन केली आहे. लोकांना परिवहनची सेवा मिळावी. स्वस्त दरात प्रवास उपलब्ध व्हावा. आत्चाी परिस्थिती अशी आहे. सध्या शहरात कोणतीही बस सुरु नाही. सर्व बसेस पनवेल, भिवंडी, वाशी नवी मुंबई याठिकाणी चालविल्या जातात.
२०१७ साली चार ते पाच लाख उत्पन्न होते. तेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचाऱ््यांचे पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जातात. १४० बसेस पडून आहेत. २०० चालक वाहक आहेत. त्यापैकी केवळ ६० चालक वाहकांचा वापर केला जात आहे. बाकी कर्मचाऱ््यांना काय फूकटचा पगार दिला जातो का ? पहिवहन सेवा दिली नाही तर परिवहन कार्यालयास आम्ही टाळे ठोकू. पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? नागरीकांनी भरलेल्या करातून केडीएमटी कामगारांना पगार दिला जातो. लोकांना सेवा कुठे मिळते. अनेक लोक कामानिमित्त कल्याणला येतात. सामान्य लोकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. त्यांनीही परिवहन सेवा बसेस उललब्ध करुन देत नाही.
परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांना परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. त्यापासून ५ लाख रुपयांचे आहे.