लोहमार्ग पोलिसांची अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यासह मोबाइलच्या अतिवापरासंदर्भात जनजागृती
By अनिकेत घमंडी | Published: August 23, 2023 02:41 PM2023-08-23T14:41:21+5:302023-08-23T14:42:47+5:30
जिद्द मनात ठेवून सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघावे अशी जनजागृती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये केली.
डोंबिवली: शालेय जीवनात नेमकं कशामध्ये करियर करायचे याबाबत ध्येय्य ठरवून त्याप्रमाणे अभ्यास, मेहनत करून पुढे जायला हवे. स्पर्धा परीक्षा या देऊन सतत अभ्यास, वाचन, चिंतन मनन करावे. स्वतःला व्यस्त करून घेतले की मग कोणतेही व्यसन जडत नाही. विशेषतः अंमली पदार्थ सेवन करू नये त्याचे दुष्परिणाम स्वतःच्या आरोग्यावर होतात, त्याचे सेवन, जवळ बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यापेक्षा जिद्द मनात ठेवून सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे बघावे अशी जनजागृती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारसामाजिक बांधिलकी जपाण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्यासह अन्य पोलिसांनी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा संकल्प सोडला. पश्चिमेकडील जोंधळे विद्यालयात संवाद कार्यक्रम पार पडला. उच्च माध्यमिक शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. मोबाइलचा अतिवापर टाळावा, त्याचे डोळ्यांवर।होणारे दुष्परिणाम, त्यामुळे मनावर होणारा एकटेपणाचा परिणाम, त्याचे तोटे हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थिनीसाठी खाकितील सखी या विषयी जनजागृती करण्यात आली रेल्वे प्रवासात काही अडचण आल्यास प्रवाशांनी ल हेल्पलाईन १५१२ यावर कॉल करून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले. सायबर क्राईम वेगाने फोफावत असून त्याचे बळी पडू नका, त्याचे दुष्परिणाम सुरक्षा संबंधी अन्य माहिती आणि इतर गुन्हे संबंधितांची माहिती देण्यात आली.
यानुसार विद्यार्थ्यांनी घरातील परिवार, शेजारी, नातेवाईक यांना सायबर गुन्हे फसवणूकी संबधि घ्यावयाची खबरदारी दक्षता या बद्दल प्रबोधन करून योग्य मार्गदर्शक सूचना कोणत्या द्यायच्या याबाबत माहिती दिली. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कामकाज व शस्त्र संबंधी माहीती दिली. विद्यार्थ्यांनी।पोलीस ठाण्यात येऊन भीती।दूर करावी असेही सांगण्यात आले. कार्यशाळेस चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून मुख्याध्यापक व शिक्षक यांनीही पोलिसांचे आभार व्यक्त केले. व असे प्रबोधनाचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करावी अशी सूचना पोलिसांना केली.