वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 07:02 AM2024-05-01T07:02:46+5:302024-05-01T07:04:32+5:30
२००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही.
कल्याण- कल्याण लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी त्यांची एकूण संपत्ती २६ लाख ९७ हजार ८६ रुपये असल्याचे जाहीर केले. २००९ साली दरेकर यांनी मनसेकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढविली होती. २००९ सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत २३ लाख १२ हजार ९९६ रुपयांची वाढ झाली. वैशाली दरेकर यांच्याकडे कर्ज नाही.
२००९ मधील एकूण मालमत्ता
• एकूण संपत्ती - ३,८४,०९०
पती सचिन राणे - २१,९५,७५०
रोख रक्कम - ५०००
वारसा हक्क - नाही.
कर्ज - नाही
गुन्हे - नाही
वाहने स्वतःचे वाहन नाही, पतीकडे दुचाकी
• बँकेत १ हजार २११ रुपये. शेअर्स नाही. ३ लाख ८४ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोने.
सदनिका पतीच्या नावे होती. त्यासाठी बँकेतून सहा लाखांचे कर्ज, तसेच अन्य एका बँकेतून दीड लाखाचे कर्ज.
सदनिका पार्थली येथे पतीच्या नावे
शिक्षण - डबल ग्रॅज्युएट
२०२४ मध्ये एकूण मालमत्ता
एकूण संपत्ती - २६,९७,०८६
पती सचिन राणे - १३,०२,१७४
मुलाच्या नावे - १,८५,२३४
रोख रक्कम ३,००,000
वारसा हक्क - नाही.
कर्ज - नाही
गुन्हे - दोन राजकीय गुन्हे
वाहने स्वतःकडे दोन
दुचाकी आहेत. पतीकडे एक
चारचाकी आणि एक दुचाकी
महाड आणि पालघर येथे
शेत जमीन
• सदनिका पार्थली येथे पतीच्या नावे