मंगळवारी भाजप ३८० जागा मिळवेल असा डोंबिवलीकर भटजी, ज्योतिष मुकुंद जोशी यांचे भाकीत
By अनिकेत घमंडी | Published: May 31, 2024 06:34 PM2024-05-31T18:34:59+5:302024-05-31T18:35:25+5:30
मंगळवारी भौम प्रदोष शंकराचा दिवस भरणी नक्षत्रामुळे भरभरून यश मिळेल, असंही
अनिकेत घमंडी
डोंबिवली: भारतात लोकसभा निवडणुका सुरू असून देशभर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. आता शेवटच्या सातव्या टप्प्याचे मतदान बाकी आहे ,त्यानंतर एक्झिट पोल सुरू होतील. त्याआधीच डोंबिवलीतील ज्येष्ठ भटजी मुकुंद जोशी यांनी (ज्योतिष अभ्यासक) राजकीय भविष्य वर्तवले असून ते म्हणाले की, शनिवारी देशात निवडणूकीचा शेवटचा टप्पा झाल्यावर सोमवारी निकालाचा दिवस आहे. तो दिवस भरणी नक्षत्र मेष रास षष्ठातून चंद्राचे भ्रमण हा शत्रुहंत्य योग आहे. भौम प्रदोष शंकराचा दिवस भरणी नक्षत्रामुळे भरभरून यश मिळेल प्रदोष आणि शिवरात्र शंकराच्या तिसऱ्या नेत्रामुळे विरोधक मुंगेरीलाल चे स्वप्न बघत राहतील, भाजपला साधारण ३८० पर्यंत जागा मिळतील परंतु पाच ते सहा मोहरे गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असा दावा त्यांनी केला आहे.
सध्या एनडीए आणि इंडिया या दोघांत चुरस असून भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रिकेचा विचार केला असता मूळ पत्रिकेत वृश्चिक लग्न, लग्नी मंगल चंद्र मंगळ राशी स्वामी, नक्षत्र स्वामी गुरु ,आणि उपनक्षत्र स्वामी मंगळ, अत्यंत शुभ, गुरु कुंभ ह्या बौद्धिक राशीत अचाट बुद्धी चालवावी, दशमात शनि सिंह राशीत, राशी स्वामी रवी , नवमांश स्वामी रवी, हा राजयोग व अधिकार योग दर्शवतो, लाभात कन्या राशीचे रवी बुद्ध केतू नेपच्यून त्यामुळे अत्यंत खडतर प्रयत्नानंतर त्यानं हा राजयोग मिळाला आहे. आता २०२४च्या निवडणुकीचा विचार केला असता मोदींना मंगळाची महादशा सुरू आहे. सध्या त्यात गुरुची अंतर्दशा शनीची अंतर्दशा सुरू आहे.
देशातील निवडणुकांच्या टप्प्यांचा विचार केला असता १६ मार्च या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मोदींच्या कुंडलीत सप्तमस्थानातून व सातवा चंद्र शुभ योग होता. त्यादिवशी अमृतसिद्धी योग अत्यंत शुभ ,शुभ मुहूर्त आहे, त्यानंतर २३ एप्रिल पर्यंत चतुर्थातून शनि मंडळाचे भ्रमण होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात शनि मंगळ युती मुळे थोड्या जागा भाजपच्या कमी येण्याची शक्यता आहे. त्याच वेळेला मोदींच्या दोन विश्वासू उमेदवारांना अपयश दर्शवते. २६ एप्रिल अनुराधा नक्षत्र वृश्चिकेचा चंद्र १ला राशी स्वामी नक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामी शुक्र अत्यंत शुभदायक या काळात मॅक्झिमम जागा मिळतील, ७ मे अश्विनी नक्षत्र मेषेचा चंद्रमा अमृतसिद्धी योग शुभ !चांगल्या प्रकारे जागा मिळतील, पण अमावस्या असल्यामुळे दोन सहकारी गमावले जातील. १३ मे कर्क राशीचा चंद्रमा पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र , चंद्रमा तोच राशी स्वामी नक्षत्र स्वामी गुरु आणि शनी अत्यंत शुभ आहे, त्यांना भरपूर जागा मिळतील.
२० मे चित्रा नक्षत्र कन्या आणि तुळेचा चंद्रमा त्यात लाभातून आणि व्ययातून चंद्राचे भ्रमण साधारण पाच वाजेपर्यंत उत्तम प्रतिसाद त्यानंतर थोडं अपयश थोडा थोडाफार फटका बसण्याची शक्यता आहे. याच काळात महाराष्ट्रातील एक किंवा दोन सहकारी गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही २५ मे ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्र राशी स्वामी मंगळ आणि गुरू नक्षत्र स्वामी बुध आणि मंगळ लग्न आणि धनस्थानातून चंद्राचं भ्रमण जागा उत्तम मिळतील १ जून उत्तरा भाद्रपदा नक्षत्र मीन राशीचा चंद्रमा राशी स्वामी गुरु नक्षत्र स्वामी शनी जो राजयोग कारक आहे भरपूर यश मिळेल असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.