ब्रश करताना तोल गेला, विहिरीत पडून मृत्यू
By प्रशांत माने | Published: October 17, 2023 04:38 PM2023-10-17T16:38:28+5:302023-10-17T16:38:59+5:30
विहिराच्या काठावर ब्रश करीत असताना त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला.
डोंबिवली: दात घासण्यासाठी ब्रश करीत असताना तोल जावून विहिरीत पडल्याने एका ४५ वर्षीय व्यक्तीचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना पुर्वेकडील आयरे गाव कोपर परिसरात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. अरविंदकुमार चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
विहिराच्या काठावर ब्रश करीत असताना त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. स्थानिकांच्या हा प्रकार निदर्शनास पडताच पोहता येत असलेल्या काही तरूणांनी वाचविण्यासाठी विहिरीत उडया घेत पाण्यात बुडालेल्या अरविंदकुमारचा शोध सुरू केला. तोपर्यंत या घटनेची माहिती डोंबिवली अग्नीशमन विभागाला देखील देण्यात आली, जवानांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
अरविंद कुमारचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढल्याची माहिती डोंबिवली अग्नीशमन विभागाचे प्रमुख विनायक लोखंडे यांनी दिली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.