नांदीवली भोपर गावात कमी दाबाने पाणीपुरवठा; दिवाळी सणाच्या तोंडावर पाणी टंचाई

By अनिकेत घमंडी | Published: November 3, 2023 06:22 PM2023-11-03T18:22:38+5:302023-11-03T18:22:45+5:30

महापालिका असो की एमआयडीसी या यंत्रणांनी एकत्र येऊन पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली

Low pressure water supply in Nandivali Bhopar village; Water shortage ahead of Diwali festival | नांदीवली भोपर गावात कमी दाबाने पाणीपुरवठा; दिवाळी सणाच्या तोंडावर पाणी टंचाई

नांदीवली भोपर गावात कमी दाबाने पाणीपुरवठा; दिवाळी सणाच्या तोंडावर पाणी टंचाई

डोंबिवली-  एमआयडीसी असो।की महापालिका या दोन्ही यंत्रणांच्या पाणीपुरवठा विंभागाकडून होणार भोपर।नांदीवली गावातील पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण ग्रामीण भागातील बहुतांशी गावात पाणी टंचाई झाली आहे.

पावसाळ्यात सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण दाबाने पाणी।सोडत नसल्याने असमान पाणी वितरित झाले, त्यावर लोकप्रतिनिधी आवाज उठवूनही एमआयडीसी यंत्रणा उपाययोजना करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महापालिका असो की एमआयडीसी या यंत्रणांनी एकत्र येऊन पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली. अमृत योजनेतून येणारे पाणी गेले कुठे? ती योजना पूर्ण।झाली की नाही असा सवाल नागरिकांनी।केला. टँकर परवडत नसून त्यातून पाणी तरी किती उपसा करायचा? अधिकारी येतात पाहणी करतात आणि जातात, पण समस्या जैसे थे असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त।केली. 

पाण्याचा प्रेशर ९० हवा मात्र या ठिकाणी पाणी ४० ते ५० दाबाने येत, सांगताना अधिकारी भरपूर चांगलं वर्णन करतात परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. गावागावात पाणी समस्या भरपूर आहे हे नक्की : रविना अमर माळी, माजी नगरसेविका, भोपर

Web Title: Low pressure water supply in Nandivali Bhopar village; Water shortage ahead of Diwali festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.