शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा
By मुरलीधर भवार | Published: March 28, 2024 04:19 PM2024-03-28T16:19:29+5:302024-03-28T16:20:14+5:30
...मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली .
कल्याण- शिवजयंती निमित्त शिवशाहीत ज्यांनी घडविले त्या राज्याच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडविले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे अशा आशयाचा वादग्रस्त देखावा कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी साकारला आहे. शिवजयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणूकीत हा चलचित्ररथाचा देखावा ही ठेवला जाणार होता. मात्र पोलिसानी या देखाव्यावर आक्षेप घेत वादग्रस्त दृश्य काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आक्षेपार्ह खंजीर कापून हटवण्यात आला आहे. याबाबत ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यानि नाराजी व्यक्त केली .
शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित शिवजयंती मिरवणुकीत राम बाग शाखे तर्फे दरवर्षी वादग्रस्त विषय हाताळले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव या दिखाव्याना कायमच पोलिस प्रशासनाकडून आक्षेप घेतले जातात. मात्र तरीही या वादग्रस्त विषयांवर देखावे सादर केले जातात .यंदाही शिव जयंती निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत चलचित्र देखाव्याद्वारे शिवशाहीत ज्यांनी घडविले त्या राज्याच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे तर दुसरीकडे लोकशाहीत ज्यांनी घडविले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे आशा आशयाचा देखावा तयार केला होता. हा देखावा आक्षेपार्ह असल्याचे पोलिसांनी हा देखावा काढण्याच्या सूचना ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख साळवी यांना केल्या होत्या .पोलिसांशी केलेल्या चर्चे नंतर या देखाव्यातील आक्षेपार्ह खंजीर कापून काढून टाकण्यात आला. त्यानंतर उपनेते साळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवशाहीत जे घडले ते आम्ही देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला ,जे सत्य आहे दाखवले पाहिजे. सत्तेच्या बाजूने पोलीस आहेत. हे चुकीचे असल्याचे साळवी यांनी सांगितले.