कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त साकारली जाणार भव्य श्रीराम मंदिर प्रतिकृती
By मुरलीधर भवार | Published: February 6, 2024 08:34 PM2024-02-06T20:34:24+5:302024-02-06T20:34:36+5:30
शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती
कल्याण- माघी गणेशोत्सवानिमित्त कल्याणमध्ये ७० फूटी भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. आमदार भोईर यांच्या संकल्पेतून कल्याण पश्चिमेतील श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात ही प्रतिकृती साकारली जाईल.
.
आमदार भोईर यांच्या माध्यमातून शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचे ३० वे वर्ष आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आ श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्या वेळेनुसार याठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत. ही प्रतिकृती ४० फूट लांब, ९० फूट रुंद आणि ७० फूट उंच इतकी भव्य आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. पुढील आठवडाभर म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना ही प्रतिकृती पाहता येणार आहे. मंदिरातील रामाचे दर्शन घेता येणार आहे.