डाेंबिवलीतील प्राणीमित्र पाॅज संघटनेने साजरी केली अशा प्रकारे महाशिवरात्र

By मुरलीधर भवार | Published: February 18, 2023 06:56 PM2023-02-18T18:56:46+5:302023-02-18T18:57:08+5:30

डाेंबिवली-महाशिवरात्रीनिमित्त आज महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाणारे दूध हे वाजा जाऊ न देता. ते दूध गाेळा करुन रस्त्यावरील जखमी प्राण्यांना ...

Maha Shivratra was celebrated in this way by the Zoomitra Pose organization in Dombivli | डाेंबिवलीतील प्राणीमित्र पाॅज संघटनेने साजरी केली अशा प्रकारे महाशिवरात्र

डाेंबिवलीतील प्राणीमित्र पाॅज संघटनेने साजरी केली अशा प्रकारे महाशिवरात्र

Next

डाेंबिवली-महाशिवरात्रीनिमित्त आज महादेवाच्या पिंडीवर वाहिले जाणारे दूध हे वाजा जाऊ न देता. ते दूध गाेळा करुन रस्त्यावरील जखमी प्राण्यांना दिले. तसेच दूधाच्या न फाेडलेल्या पिशव्या वृद्धाश्रम आणि अनाथालयांना देण्यात आला. प्लांट अॅण्ड अनिमल वेल्फेअर साेसायटी अर्थात पाॅज या प्राणीमित्र संघटनेनी महाशिवरात्र अशा प्रकारे साजरी केली. संघटनेचा हा उपक्रम राबविण्याचे हे आठवे वर्ष आहे.

पॉज संस्थेच्या कार्यकर्ते साधना सभरवाल, कौस्तव भट्टाचार्य ह्यांनी सकाळी भविकांशी संवाद साधून त्यांना विनंती केली. महादेवाच्या पिंडीवर पूर्ण दूधाचा अभिषेक न करता केवळ एक चमचाभर दूध अर्पण करून बाकीचे संस्थेला दया. संस्थेच्या या आवाहनाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, अवघ्या काही तासात सुमारे 30 लीटर दूध जमा झाले.डोंबिवलीत पूर्व आणि पश्चिम येथील शिव मंदिरात जाऊन दूध जमा करण्यात आले. जमा केलेले दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालयामधील मुलांना त्याच्बराेबर रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे याना दिले.

हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या टीमने गेली ७ वर्षांपासून करीत आहे. या वर्षी विविध रोटरॅक्ट क्लब नि व्हाइट रिव्हॉलुशन म्हणून हा उपक्रम चालवला आहे. आर. के. वृद्धाश्रम ज्यांना पॉज दरवर्षी दूध देते या वर्षी सुद्धा दूध दिले आहे. काही ठिकाणच्या मंदीरात तर काही भाविकांमध्ये बरीच जागरूकता आल्याने. या वर्षी त्यांनि दूध वाया न घालवता पिंडीवर जलाभिषेक करुन दूधाची पिशवी पाॅजच्या कार्यकर्त्यांकडे साेपविली. याविषयी संस्थेचे प्रमुख भणगे हा एक चांगला बदल दिसून येत असल्याचे सांगितले.

Web Title: Maha Shivratra was celebrated in this way by the Zoomitra Pose organization in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.