कल्याण पूर्वेतील इच्छूक उमेदवारांचा पुन्हा झळकला लक्षवेधी बॅनर

By मुरलीधर भवार | Published: September 12, 2024 04:57 PM2024-09-12T16:57:57+5:302024-09-12T16:59:31+5:30

तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

maharashtra assembly election 2024 banner of the aspirants from kalyan east again appeared | कल्याण पूर्वेतील इच्छूक उमेदवारांचा पुन्हा झळकला लक्षवेधी बॅनर

कल्याण पूर्वेतील इच्छूक उमेदवारांचा पुन्हा झळकला लक्षवेधी बॅनर

मुरलीधर भवार, कल्याण-विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधून अनेक इच्छूकांनी विविध ठिकाणी कमानी आणि बॅनर उभारले आहे. कल्याण पूर्वेतून शिंदे सेनेकडूुन इच्छूक असलेले माजी नगरसेवक विशाल पावशे यांचा असाच एक लक्षवेधी बॅनर झळकला आहे. तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

पहिले नमन विकासाचे, दुसरे वंदन ट्र’फिक मुक्तीचे, तिसरे मागणे चांगल्या रस्त्यांचे, चौथी इच्छा स्वच्छतेची, पाचवी आशा सुरक्षिततेची या गोष्टीवर भर देत साथ हवी तुमची, साथ आणि माया असे त्यावर लिहले आहे. हा बॅनर पावशे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कमानी शेजारीच लावला असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार हे तीन वेळा निवडून आलेले आमदार आहे. कल्याण पूर्वेतील शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे सध्या तळोजा जेलमध्ये आहेत.

विधानसभा निवडणूकीत कल्याण पूर्वेतून अनेक इच्छूक आहे. त्यापैकी पावशे यांनीही तयारी सुरु केली आहे. शहरातील समस्यांवर बोट ठेवत त्यांनी ब’नरबाजी सुरु केली आहे. बॅनरच्या माध्यमातून त्यांनी भाजप आमदार गायकवाड यांना लक्ष्य केले आहे .यापूर्वीही पावशे यांनी यापूर्वी दोन खळबळजनक बॅनर लावले होते. त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले होते. गणेशोत्सानिमित्त पुन्हा एकदा बॅनरच्या माध्यमातून कल्याण पूर्वेतील विकासाच्या मुद्यावर बोट ठेवत रस्ते चांगले हवेत. स्वच्छता हवी सुरक्षितता हवी असे गणरायाला साकडे घालून या समस्यां सोडविल्या गेल्या नाहीत हेच अधोरेखीत केले आहे.

Web Title: maharashtra assembly election 2024 banner of the aspirants from kalyan east again appeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.