Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

By मुरलीधर भवार | Published: October 24, 2024 01:56 PM2024-10-24T13:56:39+5:302024-10-24T14:03:11+5:30

Maharashtra Assembly Election 2024: कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपाचे उमेदवार सुलभा गायकवाड यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. 

Maharashtra Assembly Election 2024: BJP candidate Sulabha Gaikwad has filed the nomination form | Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

- मुरलीधर भवार  
कल्याण  - कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपाचे उमेदवार सुलभा गायकवाड यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रती येथील जनतेचा असलेला विश्वास आणि सुलभा गायकवाड यांनी वाढवलेला जनसंपर्क या मुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतीत असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे .

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे . सुलभा गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करीत गुरुवारी प्रभाग ड कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . त्या पूर्वी तिसाई हाऊस ते प्रभाग ड कार्यालय या दरम्यान युतीच्या अनेक गणमान्य नेत्यांच्या उपस्थितीत भव्य अशी शक्तीप्रदर्शन रॅली काढण्यात आली होती . या रॅलीत मंत्री रविंद्र चव्हाण , माजी खासदार कपिल पाटील , भाजपा नेते विनोद तावडे , ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार कुमार आयलानी , दलीत मित्र अण्णा रोकडे , कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी , उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड , अध्यक्ष संजय मोरे यांचे सह सुमारे ८ हजाराहून अधिक महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .

मोठ्या उत्साही वातावरणात आणि  ढोल ताशा , डिजे , चित्र रथ , त्याच बरोबर विविध जाती धर्मातील ताल वाद्यांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या समयी प्रसार माध्यमांशी बोलतांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की गेली अनेक दशके या मतदार संघात सेना भाजपाची युती आहे , आमदार गणपत गायकवाड यांचा प्रचंड असा जनसंपर्क आहे , त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सुलभा गायकवाड या ही निवडणूक लढत असल्याने त्यांचा विजय नक्की आहे . या रॅली दरम्यान कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: BJP candidate Sulabha Gaikwad has filed the nomination form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.