कल्याण लोकसभेतील सर्व जागांवर महायुतीचा शंभर टक्के विजय होणार - खासदार श्रीकांत शिंदे
By अनिकेत घमंडी | Published: November 9, 2024 02:33 PM2024-11-09T14:33:36+5:302024-11-09T14:37:43+5:30
महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
डोंबिवली - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश मोरे या कार्यकर्त्याला संधी दिली. राजा का बेटा राजा नाही बनेगा, यानुसार सगळीकडे कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन विकास करण्याचे काम करतोय, महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले असून यावेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या जागा शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुख दुःखात धावून येणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. मोरे यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भाजप कल्याण ग्रामीणचे महेश पाटील, माजी उप महापौर मोरेश्वर भोईर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.