उल्हासनगरात कलानी समर्थकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी

By सदानंद नाईक | Published: November 17, 2024 07:56 PM2024-11-17T19:56:03+5:302024-11-17T19:56:51+5:30

कमलेश निकमसह ३९ जनावर कलम १४४ अंतर्गत नोटीस 

maharashtra assembly vidhan sabha election 2024 income tax department raids house of kalani supporters in ulhasnagar | उल्हासनगरात कलानी समर्थकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी

उल्हासनगरात कलानी समर्थकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी

सदानंद नाईक, उल्हासनगर : निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात कलानी यांच्या दोघा समर्थकाच्या घरी आयकर विभागाच्या रविवारी धाडी टाकण्यात आल्याची कबुली कमलेश निकम यांनी दिली. तसेच कमलेश निकम यांच्यासह ३९ जणावर सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निवडणूक काळात पोलिसांनी तडीपारीची नोटीसा बजाविली आहे. या कारवाईने कलानी समर्थकाकडून नाराजी व्यक्त होत आहे.

 उल्हासनगरात महाविकास आघाडी व महायुती अशी प्रमुख लढत आहे. ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक असलेल्या. दोन स्थानिक नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्याची चर्चा होती. याबाबत कलानी समर्थक कमलेश निकम यांना बोलते केले असता, त्यांच्यासह एका कलानी समर्थकांच्या घरी धाड पडल्याची कबुली दिली. दरम्यान पोलीस परिमंडळ हद्दीतून १८ जणावर तडीपारीची कारवाई केली असून ३९ जणाना सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत निवडणूक काळात हद्दपारीच्या नोटीसा बजाविल्या आहेत. तसेच शांतता प्रस्तापित राहण्यासाठी अनेक गुन्हेगारानाही नोटीसा दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. ऐन निवडणूक काळात कलानीचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांना तडीपारीची नोटीस दिल्याने, कलानी गटाकडून नाराजीचा सुरु आहे. 

राजकीय हेतूने कारवाई... कमलेश निकम 

ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कल्याण ग्रामीण मधून पालांडे, अंबरनाथ मध्ये प्रदीप पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर, कलानी समर्थक सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आले आहेत. राजकीय हेतूने माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांनी केला.  

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 income tax department raids house of kalani supporters in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.