सहकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस गेल्यानंतर अपक्ष महेश गायकवाड आक्रमक
By मुरलीधर भवार | Published: November 18, 2024 09:38 PM2024-11-18T21:38:59+5:302024-11-18T21:39:37+5:30
उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण पूर्व मतदार संघातील उमेदवार महेश गायकवाड यांच्या सहकारी चैनू जाधव यांना हद्दपार करण्याचे नोटीस गेल्यानंतर गायकवाड चांगलेच आक्रमक झालेत भाजप उमेदवारांसोबत फिरणाऱ्यांवर कोणतेही कारवाई केली जात नाही मात्र आमच्या सहकाऱ्यांवर जाणून-बुजून कारवाई केली जाते कितीही दबाव टाकला तरी जाधव मतदारसंघातून बाहेर जाणार नाही तो काम करतच राहणार आमच्यावर कारवाई केली तर जनता हिशोब करेल असा इशाराच गायकवाड यांनी यावेळी दिला.
कल्याण पूर्व मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवणारे महेश गायकवाड यांचे सहकारी जाधव यांना पोलिसांकडून हद्दपारचे नोटीस देण्यात आली आहे या नोटीस मिळाल्यानंतर कल्याण पूर्व येथील राजकारण चांगलंच आपल्या पाहायला मिळते अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांनी थेट भाजपाला लक्ष केलं भाजप तपोतंत्राचा वापर करतोय पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला यावेळी बोलताना चैनू जाधव यांना तीन दिवसांकरिता हद्दपार करण्याची नोटीस दिली आहे.भाजप उमेदवारांसोबत फिरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांनी इशारा दिला की, कितीही दबाव टाकला तरी चैनू जाधव मतदारसंघातून बाहेर जाणार नाही.आमच्यावर कारवाई केली तरी जनता हिशोब घेईल असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.
या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड या निवडणूक लढवीत आहेत. भाजप आमदार गायकवाड यांच्या सुलभा पत्नी आहेत. एका जागेच्या वादातून गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे तळोजा कारागृहात आहेत. या गोळीबार प्रकरणात महेश गायकवाड यांच्या वतीने जाधव हे फिर्यादी आहेत. त्यांना पोलीस संरक्षण आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे.