हिंदुत्ववादी मते मिळविण्यासाठी घाणेरडे राजकारण; उद्धव सेनेच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप
By मुरलीधर भवार | Published: November 25, 2024 06:15 PM2024-11-25T18:15:52+5:302024-11-25T18:17:49+5:30
डोंबिवली मतदार संघातून भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निवडणूक लढविली.
मुरलीधर भवार, डोंबिवली-डोंबिवली मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय होईल असा दावा करणाऱ््यांनी हिंदूत्ववादी मते मिळविण्यासाठी मुंब्रा आणि भिवंडी येथील मुस्लिम शिक्षिकांना मतदान केंद्रावर जाणीवपूर्व बुरखा घालून बसविले होते. या प्रकारचे घाणेरडे राजकारण करुन निवडणूक जिंकली असल्याचा गंभीर आरोप उद्धव सेनेचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यानी केला आहे.
डोंबिवली मतदार संघातून भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली. मतदानाच्या दिवसी उमेदवार म्हात्रे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर फेरफटका मारला. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मुंब्रा आणि भिवंडी येथील मुस्लीम शिक्षिकांना बुरखा घालून बसविले गेले होते. विरोधकांची हवा तंग झाली होती. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण केले. जनतेने आम्हाला मतदान केले आहे. मात्र विराेधकांनी घाणेरडे राजकारण आणि घोटाळे करुन विजय मिळविला असल्याचा गंभीर आरोप म्हात्रे यांनी केला आहे. या आरोपानंतर भाजप यांच्याकडून काय प्रतिक्रिया व्यक्त केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.