उल्हासनगर मतदारसंघालाही हवे मंत्रीपद, आजपर्यंत मंत्रिपदापासून शहर वंचित
By सदानंद नाईक | Published: November 25, 2024 06:19 PM2024-11-25T18:19:22+5:302024-11-25T18:20:53+5:30
उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी बदलून टाकल्याचे बोलले जाते.
सदानंद नाईक, उल्हासनगर :उल्हासनगर मतदारसंघाला एकदाही मंत्रीपद मिळाले नसल्याने, कलानी गड उध्वस्त करणाऱ्या आमदार कुमार आयलानी यांना सिंधी समाजाचे नेतृत्व म्हणून मंत्री पद देण्याची मागणी सिंधी समाज व सामाजिक संघटनेकडून होत आहे. आयलानी यांनी प्रथम पप्पू कलानी, त्यानंतर ज्योती कलानी व आता ओमी कलानी यांना पराभूत केले.
उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी या समीकरणाला भाजपचे कुमार आयलानी यांनी बदलून टाकल्याचे बोलले जाते. सन-२००९ साली आयलानी यांनी पप्पू कलानी यांचा पराभव केला. पप्पू कलानी सलग चार वेळा आमदार पदी निवडून आले होते. सन-२०१४ साली ज्योती कलानी यांच्याकडून आयलानी यांचा मोदी लाटेत पराभव झाला. मात्र सन-२०१९ साली आयलानी यांनी ज्योती कलानी यांचा थोड्या फरक्याने पराभूत केले. तर आता ओमी कलानी यांना पराभवाची धूळ चारली. कुमार आयलानी सलग दुसऱ्यांदा आमदार पदी निवडून आले. सिंधी नेतृत्व व कलानी गड उध्वस्थ केला म्हणून कुमार आयलानी यांचा मंत्री पदासाठी विचार होण्याची मागणी सिंधी कॉन्सिल व समर्थकांना वरिष्ठ नेत्याकडे केली.
मतदारसंघ सुरवातीला जनसंघ, भाजपच गड राहिला असून त्यानंतर पप्पू कलानी यांच्या कुटुंबाकडे २५ वर्ष राहिला आहे. भाजपचे कुमार आयलानी सलग दुसऱ्यादा व त्यापूर्वी एकवेळा असे तीन वेळा आमदार पदी निवडून आले. राज्यात सिंधी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून तो उल्हासनगरकडे सिंधी नेतृत्व म्हणून बघतो. भाजपचा मतदार म्हणून सिंधी समाजाकडे बघितले जाते. आयलानी यांना मंत्रिपद दिल्यास, तो समाज भाजपकडे झुकणार असल्याचे आयलानी यांच्या समर्थकाचे म्हणणे आहे. आयलानी यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी सिंधी सामाजिक संघटना भाजप नेतृत्वाकडे लेखी मागणी करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.