कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचकुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
By मुरलीधर भवार | Updated: May 3, 2024 18:03 IST2024-05-03T18:00:30+5:302024-05-03T18:03:19+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण लोकसभेतून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

कल्याण लोकसभेतून अभिजीत बिचकुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कल्याण- कल्याण लोकसभेतून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा लोकसभा मतदारसंघात बिचुकले हे निवडणूक लढवत आहेत.त्याच बरोबर त्यांनी अपक्ष म्हणून ते कल्याण लोकसभेत देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.
कायद्याने मला दोन ठिकाणाहून लढण्याचा अधिकारी दिला आहे. तसेच अबू आझमी हे दोन ठिकाणाहून निवडुण येतात,शिवाय गुजरात मधून एक उमेदवार बिन विरोधात निवडून आले,त्यामुळे "आपणा भी टाईम आयेगा"अडीच वर्षात काही विकास झाला नाही अशी प्रतिक्रिया बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिली आहे.