Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 09:21 PM2024-11-10T21:21:02+5:302024-11-10T21:21:17+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कल्याणमध्ये पोलिसांनी कारवाई करत व्हॅनमध्ये १ कोटी २० लाख रुपये रोकड पकडली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी २८० कोटींची रोकड जप्त केली आहे. आज सकाळी विक्रोळी परिसरात पथकाने ६ हजार ५०० किलो चांदी जप्त केली, तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण गांधारी परिसरात भरारी पथकाने एक व्हॅनमधून १ कोटी २० लाखांची रोकड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
आज कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून वाहन तपासणीवेळी एका व्हॅनमध्ये एक कोटी रुपये २० लाखांची रोकड मिळाली आहे. या व्हॅनमध्ये एकूण रक्कम १ कोटी २० लाखांची असल्याची माहिती आहे. या रक्कमेत तफावत आढळल्याने ही व्हॅन ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. प्रश्नांची उत्तर व्यवस्थित न मिळाल्याने आता रक्कम आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, पावणेसहा वाजता एटीएमची गाडी पकडली. त्यांनी या गाड्यात १ कोटी २० लाख रुपये असल्याचे सांगितले पण यात तफावत आढळल्याने कायदेसीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या
विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एख कॅश व्हॅन पकडली आहे. या व्हॅनमध्ये साडे सहा टन चांदीच्या विटा पकडल्या आहेत. मिळालेली माहिती अशी, करोडोंच्या घरात यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालल्या होत्या या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुक आयोग, इन्कम टॅक्स, पोलिसांनी अधिक तपास करत आहेत.