नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती

By अनिकेत घमंडी | Published: May 8, 2023 06:50 PM2023-05-08T18:50:49+5:302023-05-08T18:51:02+5:30

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यानच्या मार्गावरील महावितरणच्या एकमेव २२ केव्ही उपरी रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दोन तासात पूर्ण करण्यात आले.

Maintenance and repair of the overhead power line on the railway line in Nawapada in two hours | नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती

नवापाड्यातील रेल्वेलाईनवरील उपरी वीजवाहिनीची दोन तासात देखभाल-दुरुस्ती

googlenewsNext

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यानच्या मार्गावरील महावितरणच्या एकमेव २२ केव्ही उपरी रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम दोन तासात पूर्ण करण्यात आले. महावितरणच्या डोंबिवली विभागाने रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा सुयोग्य उपयोग करत जीर्ण झालेली वाहिनी मजबूत केल्याची माहिती महावितरणने सोमवारी दिली.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि कर्जत मार्गावरील नवापाडा वगळता सर्व उपरी वीजवाहिन्या रेल्वेने भूमिगत केल्या आहेत. मात्र या मार्गावरील डोंबिवली ते ठाकुर्ली मार्गा दरम्यानची नवापाडा रेल्वे क्रॉसिंग वीजवाहिनी अद्यापही भूमिगत झालेली नाही. ही वाहिनी भूमिगत करण्यासाठीचे पैसे भरून व मंजुरी मिळूनही ऑक्टोबर २०१४ पासून रेल्वे प्रशासनाकडून काम प्रलंबित आहे. महावितरणच्या डोंबिवली विभागाकडून या कामासाठी नियमितपणे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेल्या या वीजवाहिनीमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी डोंबिवली विभागाने रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा उपयोग करून वाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले.

रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने ७ मे रोजी पहाटे एक ते पाच दरम्यान या जीर्ण वाहिनीची दुरुस्तीची (रि-जंपरिंग, तारांना जोड देणे, गार्डींग करणे आदी) कामे दोन तासात पुर्ण करण्यात आली. यावेळी डोंबिवली पश्चिम परिसराचा वीजपुरवठा पर्यायी वाहिनीवरून अखंडितपणे चालू राहील याची काळजी घेण्यात आली. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग उके यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते संजय सोनवणे, तुषार सातकर, चेतन  तेलघरे, तांत्रिक कर्मचारी नामदेव भल्ला, अमित पाटिल, अशोक कानडजे, सतीश जागले, भारत गांगुर्डे, सुनील धिंदले तसेच दीप्ती इलेक्ट्रिकल व निशि इलेक्ट्रिकल या कंत्राटदारांच्या कामगारांनी ही कामगिरी केली.
 

Web Title: Maintenance and repair of the overhead power line on the railway line in Nawapada in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.