जलशुद्धीकरण केंद्रांची देखभाल दुरूस्ती: मंगळवारी पाणी नाही
By प्रशांत माने | Published: December 17, 2023 04:36 PM2023-12-17T16:36:12+5:302023-12-17T16:36:27+5:30
विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत.
कल्याण: केडीएमसीच्या १४४ दशलक्ष लीटर बारावे जलशुद्धीकरण केंद्र, १५० दशलक्ष लीटर नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र व १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत.
मंगळवारी १९ डिसेंबरला सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत महानगरपालिकेच्या बारावे, नेतिवली, व मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण ग्रामीण (टिटवाळा, वडवली आंबिवली शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे), कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नागरीकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा असे आवाहन यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी केले आहे.