डोंबिवलीत पार पडला 'माझी माती माझा देश' कार्यक्रम

By मुरलीधर भवार | Published: August 23, 2023 03:48 PM2023-08-23T15:48:35+5:302023-08-23T15:58:59+5:30

कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी आणि मान्यवरयांचे स्वागत करण्यात आले. 

'Majhi Mati Maja Desh' program was held in Dombilvali | डोंबिवलीत पार पडला 'माझी माती माझा देश' कार्यक्रम

डोंबिवलीत पार पडला 'माझी माती माझा देश' कार्यक्रम

googlenewsNext

डोंबिवली-माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने शहीद कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक घरडा सर्कल येथे मातीला नमन, विरांना नमन हा कार्यक्रम आज सकाळी पार पडला. यावेळी शहीद सैनिक कुटुंबीय, सेवानिृत्त सैनिक आणि पोलीस यांचा सन्मान करण्यात आला. कोळशेवाडी वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी आणि मान्यवरयांचे स्वागत करण्यात आले. 

शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांचीआई सुधा आणि वडील राजा सचान, मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अरूण चित्ते यांची मुलगी खुशी चित्ते, सेवानिवृत्त ब्रिगेडियर आनंद ठाकूर, पद्मश्री गजानन माने, स्क्वाड्रन लीडर नीतू थापलीयाल, मेजर शलिल शिंदे, मेजर विनय देवगावकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील काळे, रिटायर्ड सैन्यातील हवालदार बाजीराव पाटील यांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवून गौर करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले की, देशासाठी शहीद होणारे वीर, त्यांचे कुटुंबीय, सेवानिवृत्त सैनिक, सेवानिृत्त पोलीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक देशवासीयाने आपल्या देशाची सेवा करणाऱ्या या सैनिकांप्रती अभिमान बाळगला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच उपस्थित मान्यवर रिटायर्ड ब्रिगेडियर आनंद ठाकूर यांनी डोंबिवली मधील तरुणांनी देखील सैन्यात सामील होऊन देशसेवा करावी असे आवाहन केले. पद्मश्री माननीय गजानन माने यांनी देखील विद्यार्थ्यांना उद्देशून तरुणांची देशाप्रति असणारी भावना अशीच प्रज्वलित राहावी यासाठी आशा उपक्रमास प्राधान्य द्यावे असे आवाहन केले.

ओमकार स्कूल आणि सेंट जॉन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ बँड वादन करीत शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, नितीन गिते, वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे मोहन खंदारे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शिरीष देशपांडे, शशांक देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन केले. तर वरिष्ठ पोलिस निरिक्षक क्षीरसागर यांनी पंचप्रण शपथ आणि राष्ट्रगीताने केली.
 

Web Title: 'Majhi Mati Maja Desh' program was held in Dombilvali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.