स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

By अनिकेत घमंडी | Published: May 24, 2024 05:57 PM2024-05-24T17:57:49+5:302024-05-24T17:58:12+5:30

मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना ५० लाख रुपये द्या, कुटुंबाची मागणी

Make an immediate panchnama of Dombivali MIDC blast-damaged houses, canals; Demand of local people | स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

स्फोटातील नुकसान झालेल्या घरे, गाळयांचे तात्काळ पंचनामे करा; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी

डोंबिवली -  सोनारपाडा येथे गुरुवारी अंबर (अमुदान) केमिकल कंपनीमधील स्फोटात ११ जण मृत्युमुखी तर सुमारे ६० जण जखमी झाले. त्याची दाखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. यावर स्थानिक भूमिपुत्रांनी मृत्युमुखीच्या पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि स्फोटातील नुकसान झालेल्या घरे व गाळयांचे तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी केली.

शुक्रवारी सोनारपाडा येथील श्री साईबाबा मंदिर येथे स्थानिक भूमिपुत्रांची बैठक पार पडली. या बैठकीत भूमिपुत्रांनी हा निर्णय घेतला. त्या बैठकीमध्ये गजानन पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मधुकर माळी,रतन चांगो पाटील, भाऊ पाटील, रामचंद्र पाटील, हनुमान महाराज, अजय पाटील, संदीप पालकरी, योगेश पाटील, मुरलीधर म्हात्रे, बाळाराम ठाकूर यासह स्थानिक भूमिपुत्र आणि स्फोटात ज्यांच्या घराचे व गाळ्यांचे नुकसान झाले तेही उपस्थित होते. त्यावेळी माजी नगरसेविका प्रमिला पाटील म्हणाल्या, उद्योग मंत्री उद्य सामंत हे जरी केमिकल कंपनी स्थलांतरीत करण्याच्या धोरणात्मक निर्णयावर जरी बोलले असले तरी त्यांनी त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. रासायनिक केमिकल कंपनीचे स्थलांतर व्हावे हे ही बैठक घेण्यामागचे कारण आहे तर रतन चांगो पाटील म्हणाले, ही अत्यंत दुखद घटना आहे. मुत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.

शासनाने धनाढ्य असलेल्या कंपन्याचे सर्वे चालू केले मात्र या स्फोटात ज्यांच्या घराचे नुकसान झाले, ज्यांच्या गाळ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे अजूनही का सुरु झाले नाही.शासनाने त्वरित पंचनामेकरून त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे. भाऊ पाटील यांनी येथील रासायनिक कंपन्या स्थलांतरीत करावे अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.रामचंद्र पाटील म्हणाले, या स्फोटप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उद्य सामंत यांची भेट घेऊ. पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. डोंबिवलीत अनेक स्फोट झाले पण आजवर  नुकसान भरपाई दिली नाही

विकास करायचा भूमिपुत्रांच्या जमिनींवर आणि भूमिपुत्रांच्या तोंडाला पाणी पुसायचे अशी शेतकरी भूमिपुत्राची झाली आहे. या स्फोटामुळे घरे आणि गाळे नुकसान झाले. पूर्वीपासून येथील भूमीपुत्रांची मागणी आहे येथील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करावे. आजवर अनेक मोठे स्फोट झाली. शासनाने येथील रासायनिक कंपनीचे स्थलांतर करून भूखंड विकासाच्या घशात न टाकता भूमीपुत्राला विकासाच्या केंद्र बिंदू समजून साडे बारा टक्के विकसित भूखंड द्यावे अशी आमची राज्य शासनाला विनंती असल्याचे गजाजन पाटील म्हणाले.

Web Title: Make an immediate panchnama of Dombivali MIDC blast-damaged houses, canals; Demand of local people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.