दिवाळीपर्यंत रस्ते धूळमुक्त करा, अन्यथा सामाजिक संस्था आंदोलन करणार

By मुरलीधर भवार | Published: October 31, 2023 05:56 PM2023-10-31T17:56:04+5:302023-10-31T17:56:23+5:30

सेक्रेट हार्ट हायस्कूलचे प्रमुख अलबीन अ’न्थोनी यांचा इशारा

Make the roads dust-free by Diwali, otherwise social organizations will protest | दिवाळीपर्यंत रस्ते धूळमुक्त करा, अन्यथा सामाजिक संस्था आंदोलन करणार

दिवाळीपर्यंत रस्ते धूळमुक्त करा, अन्यथा सामाजिक संस्था आंदोलन करणार

कल्याण- कल्याण डोंबिवलीतील रस्ते धूळमय झाले आहेत. शहरातील रस्ते येत्या १२ नोव्हेंबरपर्यंत धूळ मुक्त केले नाही तर खडकपाडा सर्कलवर विद्यार्थी आणि सामाजिक संस्था स्वत: पुढाकार घेऊन स्वच्छता करतील असा इशारा सेक्रेट हार्ट हायस्कूलचे प्रमुख अलबीन अ’न्थोनी यांनी दिला आहे.
आज अ’न्थोनी यांच्यासह जागरुक नागरीक फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी आयुक्त डा’. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. या वेळी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे हे देखील उपस्थित होते.

रस्त्यावरील धूळीचा त्रास होत असल्याने सेक्रेट हार्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी २५ ऑक्टोबररोजी ब प्रभाग कार्यालयास धडक दिली होती. प्रभाग कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. या प्रकरणी प्रभाग अधिकाऱ््यास जाब विचारला होता. त्यावेळी यासंदर्भात ३१ ऑक्टोबर रोजी आज बैठक घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सेक्रेट हार्ट हायस्कूलचे प्रमुख अ’थोनी यांच्यासह सामाजिक संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आज आयुक्तांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर सेक्रेट हार्ट शाळेसह जागरुक नागरीक फाऊंडेशने महापालिकेस रस्ते धूळ मुक्त करण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टीमेट दिला आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील धूळ १२ नोव्हेंबरपर्यंत दूर केली जाईल असे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या १२ नोव्हेंबरपर्यंत रस्ते धूळ मुक्त न केल्यास खडकपाडा सर्कलवर स्वत: अ’थोनी हे त्यांचा शर्ट काढून रस्ते धूळ मुक्त करण्याचे काम करतील. त्यासाठी सामजिक संस्था कार्यकर्ते, विद्यार्थी, वकिल, डा’क्टर आदी ५०० पेक्षा जास्त लोक सहभागी होतील.
अ’न्थोनी यांनी या प्रसंगी आरोप केला की, रस्त्यावरील धूळ आणि अस्वच्छतेमुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहर ग’स चेंबर झाले आहे. महापालिका स्वच्छ सर्वेक्षण म’नेज करते. त्यामुळे शहराची स्वच्छता आणि रस्ते धूळमुक्त होत नाहीत.
 

Web Title: Make the roads dust-free by Diwali, otherwise social organizations will protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण