अमूदान स्फोट प्रकरणी मलय आणि स्नेहा मेहताची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By मुरलीधर भवार | Published: May 31, 2024 06:08 PM2024-05-31T18:08:08+5:302024-05-31T18:08:18+5:30
कल्याण-डाेंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता ...
कल्याण-डाेंबिवली एमआयडीसीतील अमूदान कंपनी स्फोट प्रकरणातील आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यालाययाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या दोघांच्या न्यायालयीन कोठडीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा दुसरीकडे वळविली आहे. अमूदान कंपनीचे सेफ्टी आ’डीट केले गेले होते की नाही. जर केले नसले तर संबंधित सरकारी यंत्रणामधील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे. ते जर दोष आढल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
अमूदान कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोळामळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. तर ६४ जण जखमी झाले. ९०० पेक्षा जास्त मालमत्तांचे नुकसान झाले. या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी मालती मेहता आणि मलय मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच ठाण्यातून मलय मेहता आणि नाशिकमधून मालती मेहता यांना अटक करण्यात आली. मालती यांचा या घटनेशी संबंध नसल्याने त्यांना चाैकशी करुन साेडून देण्यात आले. मात्र कंपनीचा मालक मलय याला अटक केल्यावर त्याला प्रथम पाच दिवसांची त्यानंतर दोन दिवसांची अशी एकून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मलय याची पत्नी स्नेहा हिला घाटकोपर येथील घरातून अटक करण्यात आली.
स्नेही कंपनीत पार्टनर आहे. तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. मलय आणि स्नेहा या दोघांना आज पुन्हा कल्याण न्यायालयासमोर हजर केले असता तपास कामी पोलिसांनी आणखीन चार दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघा पत्नी पत्नीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.