खासदार क्रिडासंग्राममध्ये १६ क्रिडा प्रकारात तब्बल १३०० विजेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सन्मानित
By अनिकेत घमंडी | Published: February 13, 2024 05:39 PM2024-02-13T17:39:18+5:302024-02-13T17:40:22+5:30
केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती.
अनिकेत घमंडी,डोंबिवली: खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ठाणे जिल्हा स्तरीय खासदार क्रिडा संग्राम स्पर्धेचा सोमवारी समारोप करण्यात आला. त्यावेळी विशेषतः कल्याण।लोकसभेमधील एकाच वेळी सहा शहरात खेळवल्या गेलेल्या विविध मैदानी स्पर्धेत एकूण ३० हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. त्या क्रिडासंग्राममधील १६ क्रिडा प्रकारात १३०० विजेत्यांना मुख्यमंत्र्त्री एकनाथ शिंदे यांनी सन्मानित केले. त्यांच्यासोबत सेल्फी काढला, त्यांच्यासमवेत हस्तांदोलन केल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. येथील।संत सावळाराम क्रीडा संकुलात चार फ़्रेब्रुवारीपासून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
तेथे आकर्षक पध्दतीने, विद्युत रोषणाई, आकर्षक आतीषबाजी आणि खेळ व नृत्याच्या विविध प्रकारच्या साहसी प्रदर्शनातून आणि हजारो क्रीडा प्रेमी नागरिक व खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या ह्या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे नगरसेवक, पधाधिकारी ह्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
लाखो रुपयांची रोख रक्कम असलेली बक्षिसे व आकर्षक चषक व मेडल्स विजेत्यांना मुख्यमंत्री शिंदे, मंत्री चव्हाण व इतर पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. त्यानिमित्ताने असे सामने भविष्यात खासदार क्रिडा संग्रामातून दरवर्षी भरविण्यात येतील असे सांगून खासदार शिंदे यांनी खेळांडूसह त्यांच्या पालकांचे विशेष कौतुक केले. ते पूढे म्हणाले की, पालकांच्या पाठिंब्यामुळेच आज देशासाठी पदक मिळविणारी पिढी घडणार आहे, मोदी सरकारच्या खेलो इंडिया ह्या प्रोत्साहणातून आज देशाला आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक विजेते मिळत आहेत, आपले शहर आणि शहरातील खेळाडू हया स्पर्धेतून चालना घेऊन पुढे जातील, माझ्या प्रयत्नातून अंबरनाथ येथे उभ्या केलेल्या रायफल शूटिंग रेंज मधून आज २१ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य मिळवितात असे अभिमानाने सागवे वाटते असे खासदार ह्यांनी ह्यावेळी सांगता समारंभातील आपल्या आभार प्रदर्शनातून व्यक्त केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.