कल्याणमध्ये आठ जनावरांची सुटका करीत बाजारपेठ पोलिसांनी एकाला केली अटक
By मुरलीधर भवार | Published: July 15, 2023 03:38 PM2023-07-15T15:38:00+5:302023-07-15T15:39:52+5:30
जवळपास एक महिन्यात कत्तलीसाठी आणले गेलेल्या २३ जनावरांची सुटका करीत बाजारपेठ पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
कल्याण-गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तल साठी तस्करी करणाऱ्या एका आराेपीला अटक करीत बाजारपेठ पोलिसांनी चार बैल आणि चार गायी यांची सुटका केली आहे. कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात एका बोलेरो गाडीमध्ये ही जनावरे टाकून आणली गेली होती. या प्रकरणी साबीर चौधरीला नावाचा तरुणाला अटक करण्यात आहे. या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे याच्या तपास पा्ेलिसांनी सुरु केली आहे. आतापर्यंत जवळपास एक महिन्यात कत्तलीसाठी आणले गेलेल्या २३ जनावरांची सुटका करीत बाजारपेठ पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
रेतीबंदर परिसरात डॉन कॅन्टीन आहे. या परिसरात एका बोलेरो गाडीत गोवंशीय जातीचे जनावरे घेऊन येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी विजय साळवी यांना मिळाली. विजय साळवी यांनी ही माहिती बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांना दिली. सुनिल पवार यांनी या साठी एक पथक नेमले. पोलिस अधिकारी गुरुनाथ रुपवते, सचिन साळवी, परमेश्वर बावीस्कर, चिंतामणी कातकडे, रामदास फड आणि पोलिस कर्मचारी आंधळे यांच्या पथकाने सापळा रचला.
१० जुलै रोजी बोलेरो गाडी परिसरात येताच पोलिसानी चालक साबीर चौधरीला ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये चार बैल आणि चार गाडी यांना कोंडून ठेवले होते. जनावरांची सूटका करीत पोलिसांनी साबीर चौधरीला अटक केली. ही जनावरे कोणाच्या सांगण्यावरुन या ठिकाणी आणली गेली होती. याचा तपास पोलिस करीत आहेत. या गोवंशीय जनावरांच्या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. एका महिन्यात बाजारपेठ पोलिसांनी आत्तापर्यंत २३ जनावरांची सुटका करीत तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.