जीर्ण नारळाचे झाड पडून कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात मेडिकल दुकान, घरांचे नुकसान
By मुरलीधर भवार | Published: July 3, 2024 06:14 PM2024-07-03T18:14:23+5:302024-07-03T18:16:05+5:30
पडलेले झाड इलेक्ट्रील कटरने कापून दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण पूर्वेत आज दुपारी तीन वाजताच्या सुमार तिसगाव रोड म्हसोबा चौकात एक जुनाट झालेले नारळाचे झाड मेडिकल दुकान आणि घरांवर कोसळल्याने दुकान आणि घराचे नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पडलेले झाड इलेक्ट्रील कटरने कापून दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले.
हे नारळाचे झाड जुनाट हाेते. आज पाऊस कमी असला तरी वारा सुटला होता. वारा सुटल्याने जुनाट नारळाच्या झाडाची मुळे कमकूवत झाली होती. ते दुपारी कोसळले. हे झाड मेडिकल दुकानासह एका घरावर पडले. या घटनेत कोणतीही जखमी झालेले नाही. ही घटना घडताच परिसरातील नागरीकांसह दुकानात आैषधे घेत असलेल्या ग्राहकांनी पळ काढला. हे झाड पडल्याने या परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला. विजेच्या तारा झाड पडल्याने तुटल्या आहेत. जवळस असलेले विद्युत रोहित कोलमडले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी धाव घेत पडलेले झाड इलेक्ट्रीकल कटरने कापून दूर करण्याचे काम केले आहे. या घटना घडल्याचे कळताच शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या भागातील जुनाट आणि धोकादायक झालेली झाडे पाडण्यात यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, जुनाट आणि धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे यापूर्वीच केली होती. त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ही घटना घडली. या घटनेत कोणाचा जीव गेला असता. आत्ता तरी महापालिकेने जागे होऊन जुनाट असलेली धोकादायक झोड तोडण्याची कारवाई करावी याकडे लक्ष वेधले आहे.