उल्हासनगरात पाणी प्रश्नावर आयुक्ताकडे बैठक, मोफत मिळणार पाणी टँकर आमदार किणीकर यांनी वाचला समस्यांचा पाडा
By सदानंद नाईक | Updated: April 2, 2025 20:51 IST2025-04-02T20:51:11+5:302025-04-02T20:51:17+5:30
उल्हासनगरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा होतो.

उल्हासनगरात पाणी प्रश्नावर आयुक्ताकडे बैठक, मोफत मिळणार पाणी टँकर आमदार किणीकर यांनी वाचला समस्यांचा पाडा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ठेवलेल्या बैठकीत आमदार बालाजी किणीकर यांनी समस्यांचा पाडा वाचून दाखविला. अखेर पाणी गळती, समसमान पाणी पुरावठयाचे आश्वासन आयुक्तानी देऊन नागरिकांना पाणी टँकर मोफत देणार आहेत. असी माहिती आमदार किणीकर यांनी दिली.
उल्हासनगरात विविध ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक भागात गढूळ पाणी पुरवठा होतो. असा नागरिकांचा आरोप आहे. आमदार बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने, बुधवारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचा पाडा आमदार किणीकर यांनी वाचून दाखविला. यावेळी ठाकरेगटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, दिलीप गायकवाड, रिपाईचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल, शांताराम निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पाणी गळती वाढल्याने गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे सुभाष टेकडी येथील नागरिकांनी सांगून भीषण पाणी टंचाईची माहिती दिली.
महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी एका उपयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका समिती स्थापन करण्याचे आश्वासन देऊन एका आठवड्यात पाणी गळतीची समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. तसेच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी समसमान पाणी पुरवठा संकल्पना राबवून नागरिकांसाठी पाणी टँकर मोफत करण्याला मंजुरी दिली. असी माहिती बालाजी किणीकर यांनी पत्रकारांना दिली. सुभाष टेकडी परिसरातील ३० हजार पेक्षा जास्त लोकसंख्येला रात्री बेरात्री अपुरा पाणी होत आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.