Metro: आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

By मुरलीधर भवार | Published: February 17, 2023 03:47 PM2023-02-17T15:47:09+5:302023-02-17T15:47:46+5:30

Kalyan-Taloja Metro: कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. 

Metro: Now metro will also run on Kalyan-Taloja route, tender of 1 thousand 521 crores has been announced | Metro: आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

Metro: आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

googlenewsNext

- मुरलीधर भवार 

कल्याण - कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाेन दिवसापूर्वी कल्याणमधील विविध विकास कामांचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्राेच्या कामाला गती देणार असे सांगितले हाेते. अवघ्या दाेनच दिवसात निविदा जाहिर करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे. कल्याणचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे हा मार्ग आता दृष्टीपथात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पहिले जाते.  या प्रकल्पामुळे ठाणे पल्याड राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईसह ठाणे आणि ठाणेपल्याड कल्याण- डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. या अंतर्गत ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात १७ स्थानके आहेत. या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. या मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या कालावधीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

१७ मेट्राे स्टेशन
गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश आहे. 

निश्चित कालावधी आधीच काम पूर्ण करण्याचा मानस
कल्याण तळोजा मेट्रो मार्गिका आणि स्थानकांच्या प्रत्यक्ष  बांधकामांच्या निविदा जाहीर झाल्या असून या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर  निश्चित कालावधीच्या आधीच या मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. 
-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

Web Title: Metro: Now metro will also run on Kalyan-Taloja route, tender of 1 thousand 521 crores has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.