टेम्पोच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू; डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकातील घटना
By सचिन सागरे | Updated: October 23, 2024 21:47 IST2024-10-23T21:47:53+5:302024-10-23T21:47:53+5:30
टेम्पोचालकाने दारू पिऊन गाडी चालवली का याचा तपास पोलीस करत आहेत.

टेम्पोच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू; डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकातील घटना
डोंबिवली : टेम्पोच्या धडकेत एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा जखमी झाल्याची घटना पूर्वेकडील कावेरी चौकात बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी टेन्पो चालकाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बुद्धशील खंदारे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो सोनारपाडा ययेथे राहत होता. तर वैभव शेंडगे असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी वैभवला उपचाराकरता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोचालकाने दारू पिऊन गाडी चालवली का याचा तपास पोलीस करत आहेत.