बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे सोपे वाटते का? आमदार निलेश लंकेंचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:17 AM2022-09-08T11:17:07+5:302022-09-08T11:18:15+5:30

लंके यांनी मंगळवारी रात्री उशिरा कल्याण, उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली.

MLA Nilesh Lanka's counter attack on BJP ask Does it seem easy to demolish the fort of Baramati | बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे सोपे वाटते का? आमदार निलेश लंकेंचा भाजपवर पलटवार

बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे सोपे वाटते का? आमदार निलेश लंकेंचा भाजपवर पलटवार

googlenewsNext

कल्याण : बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे हे इतके सोपे वाटते का? फक्त बोलायचे म्हणून बोलायचे, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार निलेश लंके यांनी भाजपवर केला आहे.  

लंके यांनी मंगळवारी रात्री उशिरा कल्याण, उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत, असा सूचक इशारा शरद पवार यांना दिला तर पुढे बोलताना येत्या विधानसभा, लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करायचे, आहे  असे वक्तव्य केले होते. याबाबत  लंके यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला. लंके यांनी भाजपला लक्ष्य करताना वक्तव्य करण सोपे असते, कृती करणे अवघड असते, असे सांगितले. 

देशाला विकासाची दिशा दाखवली
ज्या बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली, राज्यात प्रत्येक झोपडीपर्यंत विकास पोहोविण्याचे काम केले त्या बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे हे इतके सोपे वाटते का? असा सवाल करत निलेश लंके यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 
 

Web Title: MLA Nilesh Lanka's counter attack on BJP ask Does it seem easy to demolish the fort of Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.