पलावा उड्डाणपूलाच्या विकास कामावरुन मनसे आणि शिवसेना शिंदे गटात ठिणगी

By मुरलीधर भवार | Published: February 22, 2023 07:11 PM2023-02-22T19:11:10+5:302023-02-22T19:11:40+5:30

विकास कामांवरुन मनसे अणि शिवसेना शिंदे गटात चांगली जुंपली आहे. शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीणमधील विकास कामे थांबिविण्यासाठी मनसे आमदार जबाबदार असल्याची टिका केली आहे.

MNS and Shiv Sena clash over development of Palawa flyover | पलावा उड्डाणपूलाच्या विकास कामावरुन मनसे आणि शिवसेना शिंदे गटात ठिणगी

पलावा उड्डाणपूलाच्या विकास कामावरुन मनसे आणि शिवसेना शिंदे गटात ठिणगी

googlenewsNext

डाेंबिवली-विकास कामांवरुन मनसे अणि शिवसेना शिंदे गटात चांगली जुंपली आहे. शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीणमधील विकास कामे थांबिविण्यासाठी मनसे आमदार जबाबदार असल्याची टिका केली आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षापासून विकास प्रकल्प रखडले आहेत. निवडणूकीच्या तोंडावर मोठय़ा घोषणा केल्या जातात. काही कामे पुढे सरकवतात. नंतर त्याचे काही होत नाही अशी टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार आणि शिवसेनेवर केली आहे. 

शिवसेना युवा सेना नेते दिपेश म्हात्रे यांनी आज मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिमेत मोठी डेव्हलमेंट होत आहे. आम्ही जी विकास कामे करतो ती टेक्नीकली साऊंड असतात. पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होते. त्याठिकाणी डेव्हलमेंट झाली. त्यानंतर पुलाचे काम सुरु झाले. पलावा जंक्शनचे काम रखडण्यात काही झारीतील शुक्राचार्य आहे. त्यामुळे कामे होत नसल्याची टिका म्हात्रे यांनी केली. मनसे आमदार राजू पाटील यांचा नामोल्लेख न करता त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलावा उड्डाणपूलाच्याला गती देण्याचे काम हाती घेतले आहे. विकास कामे पूर्ण करण्यात खासदार पटाईत आहेत. 

म्हात्रे यांच्या टिकेचा मनसे आमदार राजू पाटील यांनी समाचार घेतला आहे. पाटील यांनी सांगितले की,माझी सातत्याने मागणी हीच आहे कल्याण शीळ रोड किंवा मानकोली ब्रीज असू देत त्याला पर्याय उपलब्ध करून त्या प्रकल्पाचा विचार केला पाहिजे. निवडणूक आली की लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर काम पुढे सरकावयाचे या अनुषंगाने केलेली ती मागणी आहे यात टीका करण्यासारखं काहीच नाही. मी वस्तुस्थिती मांडली आहे. ज्यांना झोंबली त्यांना झोंबु दे असा टोला लगावला.

Web Title: MNS and Shiv Sena clash over development of Palawa flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे