मनसेनं केलं मोफत लसीकरण; 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स झाले सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 06:45 PM2021-08-19T18:45:31+5:302021-08-19T18:46:12+5:30
मोफत लसीकरण करून वेळोवेळी नागरिकांना मनसेन दिलासा दिलाय.
डोंबिवली- कल्याण डोंबिवली शहरात लसींचा तुटवडा असल्यानं वारंवार लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. कोरोनाकाळात आर्थिक टंचाई निर्माण झाल्यान गरीब -गरजू पैसे भरून खाजगी लसीकरण केंद्रात लस घेऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन याअगोदर मनसेनं रिक्षाचालक, नाभीक, घरकाम करणाऱ्या महिला व इतर गरजु घटकांसाठी मोफत लसीकरणाची मोहीम राबवली होती. आता पुन्हा जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण करण्यात आलं.
मोफत लसीकरण करून वेळोवेळी नागरिकांना मनसेन दिलासा दिलाय. अनेक लोकप्रतिनिधी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आधार घेत चमकोगिरी करत असताना मनसेनं मात्र स्वखर्चाने मोफत लसीकरण करत ख-या अर्थाने " करून दाखवलं" अस म्हणणं वावग ठरणार नाही. कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, अंधेरी, मालाड आदी परिसरातील 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स सहभागी झाले होते. राज्य सरकारने अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं मत लसीकरणासाठी आलेल्या फोटोग्राफर्सने व्यक्त केलंय. फोटोग्राफर्ससाठी सुद्धा अशाप्रकारचे आयोजन केलं गेल्यानं उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आहे. येत्या काळात गरजूंसाठी अशाच प्रकारे उपक्रम राबवणार असल्याचा मानस मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.