दरडग्रस्त तळीये गावाला मनसेकडून ११ लाखांची मदत; मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून महाडची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 05:43 PM2021-08-03T17:43:36+5:302021-08-03T17:44:15+5:30
मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला
कल्याण-
कोकणातील पूरग्रस्त भागातील गावाना मनसेच्या वतीने मदत करण्यात येत आहे. मनसेच प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी 11 लाख रुपयांचा धनादेश तळीये गावचे सरपंचांच्या हाती सूपूर्द केला आहे. मनसे आमदार कोकण पूरग्रस्त भागातील दौ:यावर आहेत. त्यांनी आज दिवसभरात महाडमधील पूरग्रस्त गावांची पाहणी केली.
डोंबिवली मनसेच्या शहर शाखेकडून कोकणातील पूरगस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रेशन कीट, बिस्कीटे, कपडे, अंथरुन पांघरुन, संतरंज्या, चादरी, मेणबत्त्या, पाणी, औषधे असे साहीत्य जमा झाले होते. हे साहित्य घेऊन मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह पदाधिका:यांना घेऊन मनसेचे आमदार पाटील हे कोकण दौ:यावर कालच रवाना झाले होते. आज आमदार पाटील यांनी महाड परिसरातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली. तळीये गावच्या सरपंचाच्या हाती गावाच्या पूनर्वसनाकरीता 11 लाख रुपये मदतीचा धनादेश सूपूर्द केला. कोकणातील मनसेचे कार्यकर्तेही कोकण परिसरातील पूरग्रस्त भागातील नागरीकांना मदत कार्य करीत आहे. आजच्या पाहणी पश्चात मनसे आमदार पाटील हे खेड, चिपळूण या पूरग्रस्त भागातील गावांना भेटी देणार आहेत.