'...अन्यथा होळीला अधिकाऱ्यांचे तोंड काळं करु'; डोंबिवलीत पाणी प्रश्नावरून मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:17 IST2021-03-25T17:00:44+5:302021-03-25T17:17:08+5:30
मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच एमआयडीसी कार्यालयावर धाव घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.

'...अन्यथा होळीला अधिकाऱ्यांचे तोंड काळं करु'; डोंबिवलीत पाणी प्रश्नावरून मनसे आक्रमक
कल्याण: कल्याण ग्रामीण परीसरातील 27 गावांत एमआयडीसी कडून सुरळीत असणारा पाणीपुरवठा मार्च महिन्यात अनियमित झाल्याचा आरोप मनसेने केलाय. हा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर एमआयडीसीच्या अधिका-यांना काळे फासण्यात येईल असा इशारा मनसेने दिला. प्रतिबंधात्मक निषेध म्हणून काळया रंगाचा डबा मनसेने अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिला आहे. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकही उपस्थित होते.
मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच एमआयडीसी कार्यालयावर धाव घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याकडुन न मिळाल्याने नागरीक अजुन संतप्त झाल्याने तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास येणाऱ्या होळीला अधिकारी वर्गाचे तोंड काळे करु असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.