फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू, राजू पाटील यांचा इशारा
By मुरलीधर भवार | Published: April 6, 2023 07:01 PM2023-04-06T19:01:15+5:302023-04-06T19:01:31+5:30
फेरीवाला धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना KDMCत आणून बसवू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.
कल्याण : येत्या महिन्याभरात कल्याण डाेंबिवलीत फेरीवाला धाेरण महापालिका प्रशासनाने लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा मनसेआमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. आज मनसेआमदार पाटील यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली.
त्यांनी फेरीवाला मुद्यावर त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस मनसेचे शहराध्यक्ष मनाेज घरत, पदाधिकारी प्रकाश भाेईर, सुदेश चुडनाईक, राहूल कामत आदी पदाधिकारी उपस्थित हाेते. फेरीवालाही माणूस आहे. त्यांच्यासाठी धाेरण राबविण्याची २०१४ सालापासून सुरु आहे. अद्याप ते लागू का झाले नाही. येत्या महिन्याभरात हे धाेरण लागू न केल्यास फेरीवाल्यांना महापालिका मुख्यालयात आणून बसवू असा इशारा दिला आहे. आयुक्त धाेरण राबविण्याविषयी सकारात्मक आहेत. गेल्या महिन्यात डाेंबिवलीत स्टेशन परिसरातीळ फेरीवाले हटविले गेले नाहीत तर आंदाेलनाचा इशारा आमदारांनी दिला हाेता.
त्यांनी आंदाेलन करण्यापूर्वीच फेरीवाले स्टेशन परिसरातून गायब झाले. तेव्हा त्यांनी हे शक्य आहे. मात्र प्रशासन करु शकत नाही. याकडे लक्ष वेधले हाेते. आज पुन्हा आमदारांनी या प्रकरणी आयुक्तांची भेट घेतली. आत्ता फेरीवाला धाेरण लागू करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. फेरीवाल्यांचा सर्वेक्षण झाले असताना त्यांचे जागा वाटप का केली जात नाही हा सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला. फेरीवाल्या प्रमाणेच रिक्षा स्टॅण्डलाही जागा उपलब्ध करुन देण्याचा मुद्दा उपस्थित केला.
सध्याचे जे राजकारण चालू आहे, कुणी फडतूस बोलतंय कुणी काडतूस बोलतंय. लोकांच्या समस्यांकडे देखील लक्ष दिल पाहिजे. मी स्वतः राजकारणी आहे. मात्र या पातळीला राजकारण नाही केले पाहिजे कोणाच्या तरी पाठी लागून आपली भाषा तशीच वापरायची याला काही अर्थ नाही काही लोकांकडून अपेक्षा असते त्याला खरे उतरले पाहिजे असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
चाैकट-राज्य सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील गावांना सुविधा देत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतं असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ८६५ मराठी भाषिक गावातील नागरिकांना राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केल्याने त्याला कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला. ही योजना महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावे असे आवाहन कनार्टकने सरकारने केले आहे. त्यावर मनसे आमदारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना टोला लागवला.