खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:20 PM2021-06-18T17:20:14+5:302021-06-18T17:21:05+5:30

केडीएमसीला कधी जाग येणार ?; नागरीकांचा संतप्त सवाल

MNS MLA Raju Patil sent materials and road rollers for bad road work | खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर

खराब रस्त्याच्या कामासाठी मनसे आमदारांनी पाठविले साहित्य अन् रोड रोलर

googlenewsNext

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका रस्ते दुरुस्तीवर कोटय़ावधी रुपये खर्च करते. मात्र आधीपासून खराब असलेल्या रस्त्याची जोरदार पावसामुळे दुरावस्था झाली आहे. यासंदर्भात कल्याण डोंबिवली महापालिकेकडे माजी अपक्ष नगरसेवकाने वारंवार तक्रार करुन देखील दखल घेत जात नसल्याने नगरसेवकाने मनसे आमदाराकडे त्याची व्यथा मांडली. त्यांच्या व्यथेची गंभीर दखल घेत मनसे आमदाराने रस्ते तयार करण्यासाठीचे साहित आणि रोड रोलर पाठविला आहे.

२७ गावातील रस्त्यांची चाळण झालेले आहे. पहिल्या पावसातच रस्ते खराब झालेले आहे. आडीवली ढोकळी परिसरातील रस्ता खराब आहे. त्यात सतत पडणा:या पावसामुळे रस्ता आणखीनच खराब झाला आहे. रस्त्यात पाणी तुंबले आहे. रस्त्यावरुन ये जा करणारे नागरीक रस्त्यात पडून जखमी होत आहे. तसेच दुचाकी चालकांना दुचाकी चालविणो अशक्य झाले आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तक्रारीची महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पाटील यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे दाद मागितली. आमदार पाटील यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली.

आमदार पाटील यांनी तातडीने रस्ता तयार करण्यासाठी खडीसह अन्य साहित्य पाठविले. त्याकरीता लागणार रोड रोलरही पाठविला आहे. आमदार तत्परता दाखवू शकतो तर महापालिकेने त्यांची जबाबदारी झटकण्यात धन्यता का मानावी असा उपरोधिक सवाल नगरसेवक पाटील यांनी उपस्थित केला आाहे. महापालिका प्रशासना कधी जाग येणार असा सवाल स्थानिग नागरीकांनी केला आहे.
मागच्या वर्षीही आडीवली ढोकली परिसरातील रस्त्यावर डांबरीकरण करुन खड्डे बुजविले जात असताना माती मिश्रीत डांबर व खडीचा वापर करुन निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याची बाब नगरसेवक पाटील यांनी उघडकीस आणली होती.

Web Title: MNS MLA Raju Patil sent materials and road rollers for bad road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.