मनसेचा 'उलट'वार! आमदारानं चक्क उलटा बॅनर ट्वीट केला, यामागचं कारण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:22 PM2022-03-17T20:22:24+5:302022-03-17T20:22:58+5:30
कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे अभिनंदन करणारा उलटा बॅनर ट्वीट केला आहे.
कल्याण-
कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे अभिनंदन करणारा उलटा बॅनर ट्वीट केला आहे. हे ट्वीट करुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर खोचक टिका केली आहे. होळीच्या निमित्ताने मनसेकडून शिवसेनेवर टिकेच्या रंगाची उधळण करण्यात आल्याने मनसे आमच्या उलटय़ा बॅनरचे ट्वीट चर्चेचा विषय आणि लक्षवेधी ठरले आहे.
डोंबिवलीतील निवासी भागातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 36 कोटी रुपये मंजूर केले असल्याचा बॅनर शिवसेनेकडून लावण्यात आला होता. काम प्रत्यक्षात सुरु झाले नसल्याने मनसेकडून त्यावर टिका करणारी बॅनरबाजी करण्यात आली होती. काम सुरु करा असा आग्रह मनसेने धरला होता. काम सुरु नसताना बॅनरबाजी काय करता असा सवाल उपस्थित केला होता.
गेल्या महिन्यात १७ तारखेला MIDC विभागातील रस्त्यांच्या कॅांक्रीटीकरण करण्याच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घाटन झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते पण अजून काम चालू झाले नाही. काम सुरू करून लवकरच हे बॅनर सरळ करून लावायची संधी द्यावी ही विनंती.@mieknathshinde@Subhash_Desaipic.twitter.com/JBgtqQ9i0j
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 17, 2022
17 फेब्रुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ झाला होता. यावेळी व्यासपीठावर मनसे आमदारही उपस्थीत होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आत्ता मनसे आमदारांनी काम सुरु झाल्यावर अभिनंदनाचा बॅनर लावावा असा चिमटा काढला होता. त्यावर मनसे आमदारांनी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार असे स्पष्ट केल होते. प्रत्यक्षात अजून कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अभिनंदनाचा उलटा बॅनर ट्विट केला आहे. यासंदर्भात आमदार पाटील यांनी सांगितले की,एमआयडीसीतील रस्ते कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला होता. आधी कामे चालू करा. लोकांना त्रस होतोय.मी अभिनंदनाचे बॅनर तयार करुन ठेवले आहे. आम्ही विरोधक आहोत. सत्ताधा:याकडून काम कसे करुन घ्यायचे. ही आमची जबाबदारी आहे. होळीच्या निमित्ताने उलटय़ा बॅनरचे ट्विट केले आहे. उलटा बॅनर डोके खाली वर पाय करुन वाचावा लागेल. तुमचे अभिनंदन केव्हाही करुन काम सुरु करा हा बॅनर सरळ करु असे सांगितले आहे.
निवडणूका आल्या. ग्रामपंचायतीचीही कामे आपण केल्याचे लोकांना सांगून कुठे तरी आपण काम केल्याचे भासवायचे. मानपाडा रोडचे काम पीडब्लूडी विभागाकडे पाठपुरावा करुन मंजूर करुन आणले. तेही काम आम्ही केले असे ते सांगतात. ठेकेदारावर प्रभाव पाडण्यासाठी ते हे सगळे करतात. त्याला आमची हरकत नाही. असू द्या. पण काम सुरु करा अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.