मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली शून्य कचरा पाहणीसाठी कर्जत नगरपालिकेस भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:55 PM2021-06-26T21:55:56+5:302021-06-26T21:56:38+5:30
या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पाची पाटील यांनी घेतली माहिती.
कजर्त नगरपालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या शून्य कचरा प्रकल्पाची पाहणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. आमदार पाटील हे पाहणीसाठी येणार असल्याने अधिकारी वर्गाने त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे उपस्थित होते. कोकरे यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची माहिती यावेळी पाटील यांनी घेतली. कचरा वर्गीकरण, ओला सूका, प्लास्टीक, थर्माकोल यांचे वर्गीकरण, प्रकल्पामध्ये फुलविलेली बाग, खत निर्मिती, कच:यापासून तयार केलेले पेव्हर ब्लॉक,स्पी़ड ब्रेकर्स, त्याच्या विक्रीतून महापालिकेस मिळणारे उत्पन्न पाहता या प्रकल्पाचे स्थानिक नागरीकांनी कौतुक केले आहे. याठिकाणी केलेल्या कामाची आमदार पाटील यांनी कोकरे यांची स्तुती केली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त कोकरे यांनी शून्य कचरा मोहिम सुरु केली आहे. मात्र अद्याप काही ठिकामी कचरा आढळून येतो. त्यात सुधारणा करता येईल. यावर चर्चा केली. महापालिकेतील कचरा संकलन आणि वर्गीकरण करण्यासाठी प्रभाग निहाय विकेंद्रीकरण करण्याची सूचना केली. त्यासाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी कोकरे यांना दिले आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या कार्यास आपला पूर्ण पाठींबा असल्याची ग्वाही दिली.