ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळ्यांची चौकशी करावी, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्वीट
By मुरलीधर भवार | Published: November 27, 2023 06:27 PM2023-11-27T18:27:22+5:302023-11-27T18:48:07+5:30
ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
कल्याण-मुंबई कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील कोविड घोटाळयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या संदर्भातील ट्वीट आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
दै. लोकमतच्या हॅलो ठाणे कल्याण डोंबिवली पूरवणीत पान एकवर रिअलिटी चेक प्रसिद्ध झाला आहे. या रिअलिटी चेक अंतर्गत कोरोनानंतर वापरामध्ये नसलेली तब्बल १ हजार ३२४ उपकरणे धूळखात या आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बातमीचा आधार घेत आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना ट्वीट आहे. आमदार पाटील यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोरोना आजाराचा बाजार मांडल्याचे आमच्यासह अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. एमएमआर रिजनमध्ये कल्याण डोंबिवलीसह ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत होते. मुंबई कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. तशीच चौकशी ठाण्यातील कोविड घोटाळ्याचीही करायला हवी असे म्हटले आहे.
कोरोना या आजाराचा बाजार मांडल्याचे आमच्यासह अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. MMR Region मध्ये विशेषत: कल्याण लोकसभा व ठाण्यात सरकारी कोविडसेंटर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत होते.मुंबईत कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे तशीच चौकशी ठाणे जिल्ह्यात पण करायला हवी. @Dev_Fadnavispic.twitter.com/urCyvx61cv
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) November 27, 2023