'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:36 PM2021-08-02T23:36:52+5:302021-08-02T23:37:15+5:30

आयुक्त हे शिवसेनेच्या नेत्यांनाच भेटत असल्याने या पूढे महापालिकेत येताना दाढी लावून येणार असा टोला आमदार पाटील यांनी लगावत आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला

MNS MLAs raju patil slams the kdmc commissioner for giving time to meet | 'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले

'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले

Next

कल्याण-

कल्याण ग्रामीणमधील देशमुख होम्समधील पाणी समस्या सोडविण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील थेट पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात पोहचले. आयुक्त भेटत नसल्याने त्यांनी हा पर्याय निवडला. आयुक्त हे शिवसेनेच्या नेत्यांनाच भेटत असल्याने या पूढे महापालिकेत येताना दाढी लावून येणार असा टोला आमदार पाटील यांनी लगावत आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.  

कल्याण ग्रामीण परिसरात येणा:या देशमुख होम्समध्ये 12क् दिवसापासून पाणी टंचाई आहे. वारंवार तक्रार करुन देखील महापालिका लक्ष देत नाही. मनसे आमदार राजू पाटील यांनी या भागात जाऊन हि समस्या कशा प्रकारे सोडविता येईल हे जाणून घेतले. काही गोष्टी आहे. ज्या केल्या तर ही समस्या सूटू शकते. आज मनसे आमदार राजू पाटील पाणी पुरवठा खात्याचे प्रमुख राजीव पाठक यांची भेट घेतली. या संदर्भात चर्चा केली. याबाबत मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की, काय करता येईल यासंदर्भात राजीव पाठक यांना सूचना केली आहे. आमदार पाटील यांचे म्हणणो आहे की, वारंवार पत्र पाठवून देखील केडीएमसी आयुक्त दखल घेत नाहीत. ती पत्रे संबंधित खात्याला पाठवून देतात. त्यांना भेटून फायदा काय. त्यामुळे मी थेट संबंधित अधिका:यास भेटलो. इतके नाही तर पुढच्या वेळी मी दाढी लावून येईन असे विधानही त्यानी केले. म्हणजे पालकमंत्र्यांचे नाव न घेता आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर साधला आहे. 
 

Web Title: MNS MLAs raju patil slams the kdmc commissioner for giving time to meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.