‘त्या’ धाडसाचे मनसेने केले कौतुक, दोन पोलिसांचा केला सत्कार

By प्रशांत माने | Published: September 12, 2023 03:37 PM2023-09-12T15:37:27+5:302023-09-12T15:38:32+5:30

अपहरण आणि विनयभंग प्रकरणात दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे.

MNS praised 'that' courage, felicitated two policemen | ‘त्या’ धाडसाचे मनसेने केले कौतुक, दोन पोलिसांचा केला सत्कार

‘त्या’ धाडसाचे मनसेने केले कौतुक, दोन पोलिसांचा केला सत्कार

googlenewsNext

डोंबिवली: खिडकाळेश्वर मंदिरात देवदर्शन करून रिक्षाने घरी परतणा-या महिलेचे दोघांनी अपहरण करीत तीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला पण गस्तीवरील दोघा पोलिसांनी नराधमांवर झडप घालत त्यांना जेरबंद केले. यात एक पोलिस जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दरम्यान पोलिसांनी दाखविलेल्या या धाडसाचे मनसेकडुन कौतुक करण्यात आले असून यात पोलिस हवालदार अतुल भोई आणि पोलिस शिपाई सुधीर हसे या दोघांचा सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी घडलेल्या अपहरण आणि विनयभंग प्रकरणात दोघा रिक्षाचालकांना अटक केली आहे. या दोघांचा पाठलाग करून महिलेचा जीव आणि अब्रू वाचविणा-या पोलिस कर्मचारी भोई आणि हसे या दोघांचे पोलिस विभागातील वरीष्ठ अधिका-यांनी देखील कौतुक केले असताना मनसेने देखील पुष्पगुच्छ आणि शाल परिधान करीत भोई आणि हसे या दोघांचे कौतुक केले. यावेळी मानपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने हे देखील उपस्थित होते. मनसे शहर संघटक हरीश पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांसह जतीन पाटील, योगेश माने, अनिल वलेकर, शरद कोंडाळकर, संतोष बिडकर आदिंनी दोघा पोलिस कर्मचा-यांचा सत्कार केला.

Web Title: MNS praised 'that' courage, felicitated two policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.