केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन
By मुरलीधर भवार | Published: September 11, 2023 06:35 PM2023-09-11T18:35:27+5:302023-09-11T18:35:35+5:30
आरोग्य खात्याचे प्रवेशद्वारच केले बंद
कल्याण- रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारात एका महिलेची प्रसूती झाल्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महापालिकेच्या आरोग्य खात्यास जाब विचारण्यासाठी पोहचले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांनी रोखल्याने कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार आेढणीने घट्ट बांधून बंद केले. जोपर्यंत या प्रकरणात जबाबदार अधिकारी समोर येत नाही. तोपर्यंत एकालाही कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा देत महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात महापालिका मुख्यालयात करण्यात आलेल्या आंदोलनात ममनसे पदाधिकारी कपील पवार, महेंद्र कुंदे, उदय वाघमारे, महिला पदाधिकारी उर्मिला तांबे आणि शितल विखणकर, चेतना रामचंद्रन, मनिषा डोईफोडे आदी कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी मनसे आंदोलकांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डा’. अश्वीनी पाटील आणि वैद्यकीय अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाचे प्रवेश द्वार तातडीने लावून घेत कार्यकर्त्यांना प्रवेशद्वावरच रोखून धरले. तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश द्वार आेढणीने बांधून ठेवले.
महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर अधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी आणलेली ट्रा’फी, पुष्पगुच्छ आणि पत्र हे प्रवेशद्वाराला बांधून जाहिर निषेध व्यक्त केला. या आंदोलनाची भनक पोलिस आणि सुरक्षा रक्षकांना मनसेने लागू दिली नाही. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महिला प्रसूती प्रकरणात प्रशासनाकडून खोटारडपणा केला जात आहे. त्यानंतर आयुक्त चौकशी करण्यात येईल असे सांगतात. महापालिकेच्या आराेग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. प्रशासनाचा खाेटे बोलण्यात पहिला नंबर आला आहे. त्यामुळे त्यांना ट्रा’फी, पुष्पगुच्छ आणि पत्र दिले आहे. आराेग्य सेवा योग्य प्रकारे दिल्या नाही तर प्रशासनाची मनसेसोबत गाठ आहे असा सज्जड इशारा प्रशासनाला दिला आहे.