आता हात जोडून सांगतोय... हात उगारायची वेळ आणू नका; इंधन दरवाढीवरुन मनसेचा रोखठोक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:31 PM2021-02-12T15:31:28+5:302021-02-12T15:32:22+5:30

MNS protest : इंधन दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्ये मनसेच्या वतीने जोरदार आंदोलन

mns protest in kalyan over petrol diesel price hike | आता हात जोडून सांगतोय... हात उगारायची वेळ आणू नका; इंधन दरवाढीवरुन मनसेचा रोखठोक इशारा

आता हात जोडून सांगतोय... हात उगारायची वेळ आणू नका; इंधन दरवाढीवरुन मनसेचा रोखठोक इशारा

Next

इंधन दरवाढीने सामान्य माणूस मेटाकूटीला आला आहे. इंधन दरवाढ कमी करा हे आता हात जोडून सांगतोय. हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा आज मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. दरवाढीच्या विरोधात कल्याणमध्येमनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हा इशारा देण्यात आला. (MNS protest in Kalyan Over Petrol Diesel Price Hike)

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेचे प्रकाश भोईर, कौस्तूभ देसाई, इरफान शेख, अशोक मांडले, उल्हास भोईर, उर्मिला तांबे, दीपीका पेडणोकर, प्रकाश माने, मंदा पाटील आदी सहभागी झाले होते.

मनसेत 'इनकमिंग'चा धडाका सुरूच, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर 'पक्षप्रवेश'

मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना दरवाढ कमी करण्यासंदर्भात एक निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोलच्या दरावाढीने शंभरी गाठली आहे. तर डिङोलच्या दरवाढीने 9क् रुपयांचा आकडा गाठला आहे. घरगूती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधऩाचे दर वाढले की, अन्य वस्तूंच्या मालवाहतूकीचा दर वाढतो. २०१४  साली केंद्र सरकारला पेट्रोल डिङोलच्या करापोटी ५३  हजार कोटी रुपये मिळत होते. सद्यस्थितीत केंद्र सरकालला १ लाख ८०० कोटीचा कर मिळत आहे. तरी देखील दरवाढ कमी न करता ती सामान्यांच्या माथी मारली जात आहे.

मनसेत प्रवेश करणारा ‘तो’ मोठा नेता कोण?; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना, भाजपाच्या मनात धडकी

सरकारची तिजोरी भरण्यासाठी केलेली दरवाढ ही अयोग्य आहे. केवळ इंधन दरवाढीने सामान्य माणूस त्रस्त नाही तर वीजेची जास्तीची बिले आणि केलली दरवाढ ही सामान्यांना भविष्य काळात अंधारात लोटणारी ठरली आहे. वीज दरवाढ कमी करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत घुमजाव केले आहे. याकडे मनसेने लक्ष वेधले.
 

Read in English

Web Title: mns protest in kalyan over petrol diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.